सह्याद्री न्यूज नेटवर्क |
महागाव : तिवरंग येथे वार्ड क्र.२ मधील मस्जिद व पोचमाय मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर सांडपाणी साचुन चिखलाचे साम्राज्य पसरले होते .कार्तिक महिन्यात काकडा निघत असुन दिंडीच्या मार्गामध्ये व मस्जिदमध्ये जाण्यास अडचण निर्माण होत असल्याने रहिवाशांनी ग्राम पंचायत प्रशासनाकडे या सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याची मागणी केली परंतु सामान्य फंडात पैसे नसल्याने व १५ व्या वित्त आयोगात सचिव साहेबांनी कसलेही आराखडा (इस्टीमेट) बनवण्यात न आल्याने नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेवुन राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते, उपसरपंच गुणवंत राठोड यांनी स्वखर्चाने मजुर लावुन या सांडपाण्याची विल्हेवाट लावली.
यावेळी ग्रा.प.सदस्य इरफान चव्हाण, संदिप मदने, संजय नांनोर, सुनिल तायडे, अजय आडे यांच्यासह गावकरी उपस्थित होते. उपसरपंच गुणवंत राठोड यांनी दाखविलेल्या कार्यतत्परतेचे गावकरी कौतुक करीत असून, त्यांचे आभार मानत आहेत.
उपसरपंचाने केले स्वखर्चाने रस्त्यावरील पाण्याचे व्यवस्थापन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 02, 2021
Rating:
