राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गाडगेबाबा यांच्या पुतळ्यांचे आमदारांच्या हस्ते अनावरण

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : तालुक्यातील निंबाळा रोड येथे लोक सहभागातून बांधण्यात आलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या पुतळ्यांचे अनावरण वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते करण्यात आले. २७ नोव्हेंबरला हा अनावरण सोहळा पार पडला. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून जी.प. सदस्य संघदीप भगत, पंचायत समिती सभापती संजय पिंपळशेंडे, सरपंचा सुनिता ढेंगळे, शिवसैनिक प्रविण खानझोडे, विद्याताई जुनगरी, पोलिस पाटील प्रविण राऊत, सेवा मंडळाचे पदाधिकारी अरविंद महातळे, मनोज दुधकोहळे, राजू आसेकर, सुभाष लसंते, मनोज ढेंगळे यांची उपस्थिती लाभली. 

संतांनी समाजाला दिलेली मानवतेची शिकवण नेहमी स्मरणात रहावी, व लोकांच्या डोळ्यासमोर नेहमी त्यांचा आदर्श उभा रहावा म्हणून गाव शहरात राष्ट्रसंतांचे पुतळे उभारले जात आहे. तुकडोजी महाराज व गाडगेबाबा हे एक आदर्श व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन लोकांनी मानवतावादी दृष्टिकोन जोपासावा, तसेच त्यांचं व्यक्तिमत्व नेहमी डोळ्यासमोर उभं रहावं हा या राष्ट्रसंतांच्या पुतळे उभारण्यामागचा उद्देश असल्याचे सेवा मंडळाने यावेळी सांगितले. 
यावेळी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनीही आपल्या भाषणातून राष्ट्रसंतांची माहिती सांगितली. तसेच संजय पिंपळशेंडे व प्रविण खानझोडे यांनीही राष्ट्रसंतांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचालन गजानन येलपुलवार केले. गावात पुतळे उभारणीपासून तर पुतळ्यांचा अनावरण सोहळा यशस्वी करण्यापर्यंत मोलाचे सहकार्य समस्त गावकऱ्यांनी केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गाडगेबाबा यांच्या पुतळ्यांचे आमदारांच्या हस्ते अनावरण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गाडगेबाबा यांच्या पुतळ्यांचे आमदारांच्या हस्ते अनावरण Reviewed by सह्याद्री चौफेर on November 28, 2021 Rating: 5
Powered by Blogger.