सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
शास्त्रीनगर येथे राहणाऱ्या रसीद खान पीर खान पठाण (२९) याचे स्वतःचेच मालवाहू पिकअप वाहन असून तो स्वमालकीचे वाहन चालवितो. २७ नोव्हेंबरला तो पांढरकवडा येथे मालवाहतूक करून रात्री ९ वाजता वणीला पोहचला. शास्त्री नगर येथील वाचनालयाजवळ अमित चांदेकर (२९) रा. नारायण निवासच्या मागे, सतीघाट रोड हा दुचाकीने रसीद खान याच्या वाहनाजवळ आला. समोर वाहने असल्याने रसीद खान थांबला असतांना आरोपीने विनाकारण त्याच्या गाडीचा साईडग्लास फिरवला. रसीद खान याने साईडग्लास का फिरविला असे विचारताच अमित चांदेकर याने रसीद खानला शिवीगाळ करित मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याच्या दोन मित्रांनी रसीद खानला वाहनाच्या खाली ओढत लाथाबुक्यांनी मारहाण केली. अचानक झालेल्या मारहाणीमुळे रसीद खान मदतीकरिता ओरडू लागला. त्याचं ओरडणं ऐकून आसपासचे लोकं मदतीला धावून आल्याने अमित व त्याच्या मित्रांनी पळ काढला. रसीद खान याच्या नाका तोंडाला जबर मार लागल्याने नाकातोंडातून रक्त वाहू लागले. त्यानंतर रसीद खान याने वणी पोलिस स्टेशनला येऊन अमित चांदेकर याच्याविरुद्ध मारहाणीची तक्रार दाखल केली. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी अमित चांदेकर व त्याच्या दोन मित्रांविरुद्ध भादंवि च्या कलम ३२५, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास ठाणेदार श्याम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहे.
मालवाहू वाहन चालकाशी वाद घालून केली मारहाण
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 28, 2021
Rating:
