नुतन देगलुरचे आमदार अंतापुरकर यांनी आपले वडील यांनी दिव्यांगासाठी राखीव असलेला दिव्यांग निधी देण्याचे बिलोली येथील दिव्यांग शिबिरात दिलेले आश्वासन पूर्ण करतील काय? - अनिल रामदिनवार यांनी केली निवेदनातून मागणी

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

नांदेड : दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष मा चंपरतराव डाकोरे पाटिल यांच्या आदेशानंतर बिलोली देगलुर चे नुतन आमदार मा अंतापुरकर यांची दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र ता देगलुर चे ता अध्यक्ष अनिल रामशेटवार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने भेट घेऊन दिव्यांग बांधवांसाठी राखीव आमदार निधी आपल्या मतदारसंघात 3 डिसेबर दिव्यांग जागतिक दिनी वाटप करावा म्हणून निवेदन देऊन मागणी करण्यात येत आहे.
    
१) शासन निर्णय नियोजन विभाग मंञालय मुंबई क्र स्थाविका - 0616/प्र क्र.96/1482 दि.12/7/2016

२) जिल्हा नियोजन समिती जिल्हाधिकारी नांदेड जा व क्र.नियो/अस्थाविका/का-6/21/22/1461 दि.24/11/21

वरिल शासन निर्णय व जिल्हा नियोजन समिती यांच्या पञानुसार आमदार स्थानिक विकास कार्यक्रम 2021-22 दिव्यांगासाठी अनुज्ञेय कामे आपल्या मतदारसंघात दहा लक्ष निधी दिव्यांगासाठी शासन निर्णय 1 प्रमाणे खर्च करू शकतात तरी दिव्यांगासाठी असलेला निधी खर्च करून दिव्यांगाना आधार द्यावा.     
महाराष्ट्र शासन दिव्यांग हा सर्व सामान्य जनतेसाठी जीवन जगता यावे म्हणून शासन 2016 ला दिव्यांग कायदा करुन अनेक शासन निर्णय वरिष्ठ आदेश असुन संसदेत कायदा करणारे खासदार, आमदार यांनीच अंमलबजावणी करित नसल्यामुळे दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्षांपासून शासन प्रशासनाचे लक्ष व अनेक आमदार यांना निवेदनाद्वारे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न चालू असुन, देगलुर मतदार संघाचे नुतन आमदार अंतापुरकर यांना ता अध्यक्ष अनिल रामदिनवार यांच्या नेतृत्वाखाली खालील शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे दिव्यांग आमदार निधीची  मागणी केली.
     
नुतन देगलुरचे आमदार अंतापुरकर यांनी आपले वडील यांनी दिव्यांगासाठी राखीव असलेला दिव्यांग निधी देण्याचे बिलोली येथील दिव्यांग शिबिरात दिलेले आश्वासन पूर्ण करतील काय? - अनिल रामदिनवार यांनी केली निवेदनातून मागणी नुतन देगलुरचे आमदार अंतापुरकर यांनी आपले वडील यांनी दिव्यांगासाठी राखीव असलेला दिव्यांग निधी देण्याचे बिलोली येथील दिव्यांग शिबिरात दिलेले आश्वासन पूर्ण करतील काय? - अनिल रामदिनवार यांनी केली निवेदनातून मागणी Reviewed by सह्याद्री चौफेर on November 28, 2021 Rating: 5
Powered by Blogger.