श्री गुरुदेव विदयालय व कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन संपन्न

सह्याद्री न्यूज | शंकर घुगरे 

वणी : शिरपूर येथील श्री गुरुदेव विदयालय व कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन संपन्न झाला. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.ना.पु.पिंपळकर सर, पर्यवेक्षक श्री मो.ल.परचाके सर व प्रा.वि.दे.करमनकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.

मुख्याध्यापक श्री.ना.पु.पिंपळकर सर, पर्यवेक्षक श्री. परचाके सर व प्रा.वि.दे.करमनकर सर यांनी संविधानाचे महत्व पटवून सांगितले तर, प्रा.गणेश लोहे सर यांनी संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन केले त्यांच्या पाठोपाठ सर्व विद्यार्थी तसेच शिक्षकांनी संविधान वाचन केले.

कार्यक्रमाचे संचलन श्री.लोहे सर व श्री.योगेश किन्हेकर सर यांनी केले तर प्रा श्री.रुपेश धुर्वे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व वर्ग ५ ते १२ चे विद्यार्थी उपस्थित होते.
श्री गुरुदेव विदयालय व कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन संपन्न श्री गुरुदेव विदयालय व कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन संपन्न Reviewed by सह्याद्री चौफेर on November 26, 2021 Rating: 5
Powered by Blogger.