सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : भारतातील संविधान हे जगातील सर्वात माेठे संविधान असल्याचे मत चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी व्यक्त केले. ते आज येथील मुख्य मार्गावर असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात समता सैनिक दल, भारतीय बाैध्द महासभा, रिपब्लिकन पक्ष, व डॉ.बाबासाहेब आंबेडकर शतकाेत्तर जयंती महोत्सव समिती चंद्रपूर व्दारा आयोजित संविधान सन्मान दिन व प्रबाेधन सभा कार्यक्रमात कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बाेलत हाेते. ते पुढे म्हणाले की, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विधानचा मसुदा तयार करतांना अहाेरात्र मेहनत घ्यावी लागली. दाेन वर्षानंतर हा मसुदा तयार झाल्यानंतर ताे संविधान सभेत सादर करण्यात आला. त्या नंतर भारतीय राज्यघटना पारीत करण्यात आली.
आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्ह्याचे पाेलिस अधिक्षक अरविंद साळवे, प्रविण खाेब्रागडे, निर्मला नगराळे, अ.वि.टेंभरे, प्रतिक डाेर्लिकर, राजकुमार जवादे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित हाेते. कार्यक्रमाच्या आरंभी महामानव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्याला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने व पाेलिस अधिक्षक अरविंद साळवे यांनी पुष्पमाला अर्पित करुन अभिवादन केले.
या वेळी सामूहिक राष्ट्रगाण झाले. जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी मंचावर भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवि मून यांनी केले तर सूत्रसंचालन चंद्रपूरच्या मृणाली कांबळे यांनी केले. उपरोक्त कार्यक्रमाला पुरुषां साेबतच महिलांची उपस्थिती विशेष उल्लेखनिय हाेती.
भारतातील संविधान हे जगातील सर्वात माेठे संविधान -जिल्हाधिकारी अजय गुल्हाने
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 26, 2021
Rating:
