सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी : एका बियरबार व रेस्टोरंट मध्ये खाद्य पदार्थ बनविणारा एक रसोई कारागिर त्याच बियरबार जवळ गंभीर जख्मी अवस्थेत पडून होता. त्याने बियरबारच्या माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली असावी अशी त्या परिसरात चर्चा आहे. ही खळबळजनक घटना काल ५ नोव्हेंबरला उघडकीस आली. श्याम टॉकीज परिसरात असलेल्या या बियरबार व रेस्टोरंट मध्ये सदर इसम हा कुक म्हणून काम करायचा, व तेथेच राहायचा. खुप वर्षापासून या बियरबारमध्ये कुक म्हणून काम करणारा हा कारागिर असा अचानक माळयावरुन कसा काय पडला की, त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले, याचा अद्याप उलगडा झालेला नाही. त्याने नैराश्यातून आत्महत्या केली की, आणखी काही कारण आहे, ही शोधनीय बाब आहे.
शाम टॉकीज परिसरातील नामांकित बियरबार व रेस्टोरंटमध्ये कुक म्हणून काम करणारा इसम काल बियारबार जवळ जख्मी अवस्थेत पडून होता. त्याने बियरबारच्या माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केल्या जात आहे. बालाजी मेश्राम वय अंदाजे ४० वर्ष रा. कोरपना असे या आत्महत्या केल्याचा संशय असलेल्या कुकचे नाव आहे. बियरबार जवळ पडून असलेल्या त्या कुकला उपचाराकरिता चंद्रपूर येथे हलविण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सर्वत्र दिवाळी सारखा सण साजरा होत असतांना या गरीब कारागिराचा अचानक बियरबार जवळ पडून मृत्यु झाल्याने हळहळ व्यक्त केल्या जात आहे. त्याने आत्महत्या केली की, अन्य कोणत्या कारणाने त्याचा मृत्यु झाला हे अद्याप कळू शकलेले नाही. पोलिस तपासात ते निष्पन्न होईल.
नैराश्येच्या वादळात आणखी एक दीप विझला, बियरबार मधिल कुकने घेतला जगाचा निरोप
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 06, 2021
Rating:
