सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्य महामंडळ परिवहनच्या कर्मचाऱ्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या मूलभूत मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला आहे. दरम्यान या संपात राजुरा आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी आपला सहभाग नाेंदविला आहे. सदरहु संपाला वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे यांनी भेट देऊन कर्मचाऱ्यांच्या संपूर्ण मागण्या आज जाणून घेतल्या त्यांचे रास्त मागण्या त्वरित मान्य झाल्या पाहिजे यासाठी त्यांनी आपल्या पक्षाच्या वतीने संपाला जाहीर समर्थन दिले आहे.
एसटीतील तुटपुंजा वेतनामुळे व वेतनाच्या अनियमितपणामुळे कर्मचाऱ्यांचे माेठ्या प्रमाणात हाल होत आहे. एसटी महामंडळातील कर्मचारी दिवस-रात्र काम करून त्यांना थोड्याच वेतनात समाधान मानावे लागते. राज्य सरकारने यावर विचार करावा व एसटी महामंडळ राज्य सरकार मध्ये विलीनीकरण करावे या मागणीला घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात दिपावलीच्या शुभमुहूर्तावर कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या संपामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून यावर सरकारने तात्काळ ताेडगा काढावा व एसटीतील कर्मचा-यांना राज्य शासनामध्ये विलगीकरण करण्यात यावे असे मत राजू झोडे यांनी आज भेटी दरम्यान व्यक्त केले.
राजूरा एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या संपाला राजू झाेडेंची भेट !
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 06, 2021
Rating:
