Top News

संप लढ्यात एसटी कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग - निलंबनाचे सत्र सुरुच


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : एसटीचे राज्य शासनात विलीकरण करा या प्रमुख मागणीसह इत्तर काही मागण्यांसाठी गेल्या २९ ऑक्टाेंबर पासून चंद्रपूर जिल्ह्यातील एसटी महामंडळाचे कर्मचारी संपात उतरले असून, अद्याप शासनाने त्यांच्या मागण्यां बाबत ठाेस ताेडगा न काढल्यामुळे त्यांचा संप जैसे थे आहे.

या संपात चंद्रपूर जिल्ह्यातील अंदाजे अडीच ते तीन हजार कर्मचारी स्वयंस्फुर्तीने सहभागी झाले असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, त्यांचे या सुरु असलेल्या संपाला अनेक सामाजिक संघटनांनी आपले जाहिर समर्थन व पाठिंबा दिलेला आहे. चंद्रपूर बसस्थानक वरुन नित्य ४५० ते ५०० बसेसच्या फे-या सुरु हाेत्या त्या आता सुरु असलेल्या संपामुळे पुर्णता बंद पडल्या आहे. दरम्यान,एसटी कर्मचा-यांनी नियमबाह्य संप केला हे कारण समाेर करीत शासनाने कडक पाऊले उचलत कर्मचा-यांवर निलंबन कारवाईंचा बडगा उगारला आहे. हे वृत्त लिहीपावेताे जिल्ह्यातील ३३ कर्मचा-यांना निलंबित केले असल्याचे समजते.

सदरहु संपामुळे चंद्रपूर एसटी महामंडळाचे अंदाजे नित्य २५ ते ३० लाख रुपयांचे नुकसान हाेत असल्याचे बाेलल्या जाते. चालक,वाहक व यांत्रिकी यांना अत्यंत अल्प वेतनात काम करावे लागत असुन त्यांचे या वेतनात वाढ करण्यांचे गरजेचे असतांना देखिल त्यांच्या पगारात म्हणावी तशी वाढ झालेली नाही. ते कर्मचारी तुटपुंज्या वेतनात आज पावेताे आपल्या कुटुंबाचा उदार निर्वाह करीत आले आहे.
एसटीच्या कर्मचारी संपामुळे खासगी ट्रॅव्हल्स धारकांना सुगीचे दिवस आले असुन, शहरी भागा साेबतच ग्रामीण भागातील प्रवाश्यांचे हाल हाेत आहे. काही शासकीय कार्यालयातील नित्य ये-जा करणारे कर्मचारी आता आप आपल्या मुख्यालयातच राहुन ड्यूटी करीत आहे. काही ठिकाणी एसटीच्या कर्मचा-यांनी मुंडण करुन राज्य शासनाचा निषेध केला आहे. जाे पर्यंत मागण्या पूर्ण हाेत नाही ताे पर्यंत हा संप असाच सुरु ठेवण्याचा निर्धार एसटी कर्मचा-यांनी केला आहे.    
Previous Post Next Post