नगरपंचायत निवडणुकीचा वाजला बिगुल; प्रभागनिहाय आरक्षण जाहीर

सह्याद्री न्यूज | रवि घुमे 

मारेगांव : Covid-19 च्या वाढलेल्या प्रादुर्भावामुळे मारेगांव नगरपंचायत ला प्रशासकीय समिती नेमून कार्यकाळ पूढे वाढवावा लागला. नगरपंचायत च्या एकूण १७ वार्डात विभागलेल्या मारेगांव नगरपंचायत चे आरक्षण अखेर आज दिनांक १२ नोव्हेंबरला जाहीर करण्यात आले ते खालील प्रमाणे.
प्रभाग क्रमांक 1. सर्वसाधारण महिला,
प्रभाग क्रमांक 2. सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 3. सर्वसाधारण, 
प्रभाग क्रमांक 4. सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 5. ना.मा.प्र. महिला,
प्रभाग क्रमांक 6. ना.मा. प्र.महिला,
प्रभाग क्रमांक 7. अनुसूचित जमाती महिला,
प्रभाग क्रमांक 8. सर्वसाधारण, 
प्रभाग क्रमांक 9. सर्वसाधारण, 
प्रभाग क्रमांक 10. सर्वसाधारण महिला,
प्रभाग क्रमांक 11.अनुसूचित जाती महिला, 
प्रभाग क्रमांक 12. अनुसूचित जाती,
प्रभाग क्रमांक 13. अनुसूचित जमाती, 
प्रभाग क्रमांक 14. ना. मा. प्र. प्रतीनिधी,
प्रभाग क्रमांक 15. अनुसूचित जमाती महिला, प्रभाग क्रमांक 16. सर्वसाधारण,
प्रभाग क्रमांक 17. सर्वसाधारण,
अशा प्रकारे आरक्षण काढण्यात आले.
या वेळी प्राधिकृत अधिकारी तथा ऊप विभागीय अधिकारी डॉ शरद जावळे, मुख्याधिकारी संदीप माकोडे, नोडल अधिकारी तथा अभियंता निखिल चव्हाण, कर निरीक्षक निलेश तुरणकर, लिपिक गणेश निखाडे यांनी काम सांभाळले. तसेच यावेळी शहरातील विविध पक्षातील राजकीय पदाधिकारी उपस्थित होते.
आरक्षणाकडे बघता असे दिसून येते की यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त महिलांना प्राधान्य देण्यात आल्याचे दिसून येत आहे.
या वेळी प्रभाग क्रमांक ११ व १२ अनुसूचित जाती (SC) तर प्रभाग क्रमांक ७, १३, व १५ अनुसूचित जमाती (ST) या मागासवर्गीय प्रवर्गातील आरक्षण कायम ठेवून उर्वरित प्रभागाचे आरक्षण ईश्वर चिट्ठी ने जाहिर करण्यात आले आहे. हे विशेष!
नगरपंचायत निवडणुकीचा वाजला बिगुल; प्रभागनिहाय आरक्षण जाहीर नगरपंचायत निवडणुकीचा वाजला बिगुल; प्रभागनिहाय आरक्षण जाहीर Reviewed by सह्याद्री चौफेर on November 12, 2021 Rating: 5
Powered by Blogger.