सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : देशसेवेचे स्वप्न बघू पाहणारा समीर नावाचा एक तरुण युवक हा एका रस्ता अपघातात जखमी झाल्यामुळे त्यास उपचारार्थ खासगी रुग्णालयात नुकतेच दाखल करण्यात आले आहे.
चंद्रपूर नजिकच्या मोरवा येथील समीर जगदीश सिडाम हा अत्यंत गरीब परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण करीत आहे. एनसीसीच्या माध्यमातून देशसेवेसाठी सैन्यात भरती होण्याचे त्याचे स्वप्न हाेते. समीर घरी येत असतांना त्याचा अपघात झाला. त्यानंतर त्याला उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचाराचा खर्च बराच मोठा असल्याने समीरच्या कुटुंबियांसमोर पैशाची जुळवा जुळव कशी करायची हा माेठा प्रश्न निर्माण झाला होता. त्याच्या या अपघाताची बातमी कानावर पडताच येथील जेष्ठ व्हॉलीबॉल बहुउद्देशीय संस्थेने पुढाकार घेत त्याच्या परिवारास तात्काळ आर्थिक मदत केली.
उपराेक्त युवक क्रिकेट खेळून घरी येत असतांना हा अपघात झाला. या अपघातात त्याच्या पायाला, कंबरेला गंभीर दुखापती झाल्या हाेत्या त्याला उपचारार्थ लगेच डॉ. टोंगे यांचे हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. रुग्णालयात त्याचे पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर पुन्हा उपचारासाठी खर्च मोठा येणार असल्याचे डॉक्टरांनी यावेळी सांगितले. काही वेळातच समीरच्या काही जिवलग मित्रांनी समाज माध्यमांवर समीर साठी मदतीचे आवाहन केले. ही माहिती उपराेक्त संस्थेच्या सदस्यांना कळताच समीरला मदत करण्याचा त्यांनी क्षणाचा विलंब न लावता निर्णय घेतला. हॉस्पीटलमध्ये जाऊन त्यांनी त्याच्या आईकडे ३० हजार रुपयांची मदत सुपूर्द केली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रदीप जानवे, उपाध्यक्ष श्यामकांत थेरे, सचिव दिपक जेऊरकर, कोषाध्यक्ष रामस्वामी कापरबोईना तथा जेष्ठ व्हॉलीबॉल बहुउद्देशीय संस्थेचे इत्तर सदस्यगण उपस्थित होते.
देशसेवेचे स्वप्न बघणारा झाला अपघातात गंभीर जखमी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 12, 2021
Rating:
