सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
वणी : वणी परिसरातील सामाजिक व सांस्कृतिक वातावरण सुदृढ व्हावे आणि सांस्कृतिकीकरणाला चालना मिळावी या सार्थ हेतुने शिव महोत्सव समितीची २०१५ साली स्थापना झाली. याच समितीच्या वतीने गेल्या सहा वर्षापासुन वणी शहरात बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन होत आहे.स्थानिक बाजोरिया लॉन येथे सायंकाळी ६:३० वाजता आयोजित या वर्षीच्या व्याख्यानमालेस लोकसाहित्य व संस्कृतीचे अभ्यासक डॉ.साहेबराव खंदारे,परभणी हे संबोधित करणार आहेत.
दि.१३ नोव्हेम्बर रोज शनिवारला पंचाशिल शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष दिलीप पेचे हे या व्याख्यानमालेचे ऊद्घाटन करतील. व्याख्यानमालेचे पहिले पुष्प दिवंगत रामचंद्र जागोजी सपाट यांना समर्पित असुन डॉ.साहेबराव खंदारे हे 'आधुनिकता आणि शाश्वत विकास ' या विषयावर श्रोत्यांशी संवाद साधतील.रविवार दि.१४ नोव्हेम्बर ला दुपारी एक वाजता डॉ.साहेबराव खंदारे यांची प्रकट मुलाखत बाजोरिया हॉल येथे प्रा.दिलीप चौधरी आणि जयंत साठे घेतील.व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प दिवंगत परमानंद रामचंद्र कापसे यांना समर्पित असुन दि.१४ नोव्हेम्बरला डॉ.साहेबराव खंदारे 'परंपरा आणि शाश्वत विकास 'या विषयावर संवाद साधतील.
गेल्या सहा वर्षापासुन या व्याख्यानमालेला महाराष्ट्रातील नामवंत विचारवंतांनी मार्गदर्शन केले असुन वणी परिसरातील समाजबांधव अत्यंत उत्कंठतेने या व्याख्यानमालेची प्रतिक्षा करीत असतात.या वर्षी शिव महोत्सव समितीच्या अध्यक्षस्थानी वणीचे प्रख्यात विमा व्यावसायीक शहाबुद्दीन अजाणी यांची तिन वर्षाकरिता निवड झाली आहे.
बळीराजा व्याख्यानमालेस डॉ साहेबराव खंदारे संबोधित करणार; शिव महोत्सव समितीचा ऊपक्रम
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 12, 2021
Rating:
