गड्यात आढळून आला इसमाचा मृत्यूदेह

सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 

मारेगाव : तालुक्यातील नरसाळा येथील जुन्या गिट्टी क्रेशरच्या बाजुला गट क्र.२०७ शासकीय जमिनीच्या बाजुला असलेल्या गड्ड्याच्या पाण्यामध्ये एका इसमाचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत आढळून आले. 

आज दि.२१ नोव्हेंबर रोज रविवारला दुपारी २ च्या दरम्यान, ही घटना उघडकीस आली. भीमराव भवानी आत्राम (६५) रा. नरसाळा असे मृतक इसमाचे नाव आहे. घटनेची वार्ता परिसरात वाऱ्या सारखी पसरताच गावातील अनेकांनी मृतदेह पाहण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली.

प्रेत कुजलेल्या अवस्थेत असल्याची माहिती मारेगाव पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून सदर घटनेचा पंचनामा करून मृत्यूदेह उत्तरीय तपासणीसाठी मारेगाव ग्रामीण रूग्णालयात पाठवण्यात आला असून, या घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे. मात्र,भीमराव दोन तीन दिवसांपासून घरी नसल्याचे गावात चर्चा आहे. भीमराव यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले व एक विवाहित मुलगी असा आप्त परिवार आहे.
गड्यात आढळून आला इसमाचा मृत्यूदेह गड्यात आढळून आला इसमाचा मृत्यूदेह Reviewed by सह्याद्री चौफेर on November 21, 2021 Rating: 5
Powered by Blogger.