नागपूर : डॉ.स्मिता मेहेत्रे यांची अध्यक्षपदी निवड !

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : १४ व्या अखिल भारतीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं महिला व्यासपीठाच्या मार्गदर्शिका तथा उपराजधानी नागपूरच्या सुपरिचित साहित्यिका डॉ. स्मिता निशिकांत मेहेत्रे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे संमेलन दि. २५ नोव्हेंबर २०२१ रोजी साेलापूरच्या निर्मलकुमार फडकुले सभागृहात हाेणार आहे. सदरहु संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रा. पंडितराव लोहोकरे असून, निमंत्रक अनिल अनभुले, राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे, उपाध्यक्ष शुभांगी ताई काळभोर, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष फुलचंद नागटिळक, प्रदेश संघटक अमोल कुंभार आदीं प्रामुख्याने या संमेलानाला उपस्थित राहणार आहेत. डॉ. स्मिता मेहेत्रे या नागपूरकर ते सोलापूरकर असा स्नेहभाव साहित्य संमेलनाच्या निमित्ताने जुळून आणीत आहे.

तदवतचं डॉ. मेहेत्रे यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्वस्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान प्रगती मानकर, प्राप्ती माने, डॉ. माधुरी सपाटे, ॲड. नितीन देशमुख, रजनी राणेकर, ॲड. रोमा खंडवाणी, मिलिंद फुलझेले, संध्याताई राजूरकर, डॉ. विणा राऊत, प्रा.माधुरी गायधने, विलास गजभिये, बलदेव आडे, महेश भामरे, राजेश चिकाटे, चंद्रपूर-गडचिराेली या जुळ्या जिल्ह्यातील सहजं सुचलं महिला व्यासपीठाच्या मुख्य मार्गदर्शिका ॲड.मेघा धाेटे, याेग शिक्षिका मायाताई काेसरे, संयाेजिका सुविद्या बांबाेडे, सारीका खाेब्रागडे, सराेज हिवरे, उज्वला यमावार, अल्का सदावर्ते, सिमा पाटील, नंदिनी लाहाेळे, प्रभा अगडे, रजनी रनदिवे, नितू जैस्वाल आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
नागपूर : डॉ.स्मिता मेहेत्रे यांची अध्यक्षपदी निवड ! नागपूर : डॉ.स्मिता मेहेत्रे यांची अध्यक्षपदी निवड !  Reviewed by सह्याद्री चौफेर on November 21, 2021 Rating: 5
Powered by Blogger.