सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : जगभरात महाभयानक कोरोनाचे संकट आले तेव्हा पासून कुठल्या ही प्रकारच्या यात्रा किंवा जमावाला परवानगी मिळाली नसून ह्या वर्षी सुद्धा चंद्रपूर जिल्ह्यातील वढा यात्रेला प्रशासनाने परवानगी दिलेली नाही. परंतु श्रध्देपाेटी भाविक या मंदीरात दर्शनार्थी साठी येत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
वर्धा, पैनगंगा आणि निर्गुडा नदीच्या त्रिवेणी संगामावर वढा येथे दरवर्षी आषाढी कार्तिकी पौर्णिमे निमित्त मोठी यात्रा भरते. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ही यात्रा गत वर्षी व यावर्षी सुद्धा रद्द करण्यात आली आहे. येथे विठ्ठल रुख्मिणीचे पुरातण मंदिर असल्यामुळे आणि त्रिवेणी नदीच्या संगामावर हे मंदिर वसल्याने यात्रेसाठी विदर्भातील ठिकठिकाणाहुन श्रद्धाळु मोठया संख्येने येत असतात. त्रिवेणी संगमावर गंगास्नान करून भाविक विठ्ठल रुख्मिणीचे दर्शन घेतात. या तीर्थक्षेत्राला छोटे पंढरपूर म्हणून ही ओळखले जाते. परंतु यावर्षी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता ही यात्रा रद्द करण्यात आली आहे. कलम 37 संपुर्ण जिल्ह्यात लागू असून वढा येथील यात्रा महोत्सव रद्द करण्याचे निर्देश दिले आहे. कुणीही दुकाने लावू नये व गर्दी करू नये असे आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा आदेश काढण्यात आला आहे.
वढा येथे भरणारी यात्रा झाली रद्द-यात्रा रद्द हाेण्याचे सलग २ रे वर्ष !
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 19, 2021
Rating:
