भावी शिक्षकांची वाट बिकट! परिक्षा परिषदेची मनमानीमुळे शेकडो भावी शिक्षक टीईटी पासुन वचिंत राहण्याची शक्यता
सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
नांदेड : येत्या 21 नोव्हेबर रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयोजित शिक्षक पात्रता परिक्षेचे नियोजन करण्यात आले आहे.राज्यभरातील लाखो विद्यार्थी सदर परीक्षा देणार आहेत. परंतु,सध्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळचा संप तीव्र झाल्यामुळे अनेक परीक्षार्थी परीक्षा केंद्रांवर पोहोचन्यासाठी मोठी गैरसोय होणार आहे.सदर परीक्षा जवळपास चार वर्षानंतर होत असल्याने अनेक भावी शिक्षक परिक्षेसाठी अहोरात्र अभ्यास करत आहेत. मात्र एस. टी. संपाचा परीक्षा परिषदेने गांभीर्याने विचार विचार करून रविवारी होणाऱ्या परिक्षेसंदर्भात योग्य निर्णय घेण्याची अपेक्षा परीक्षार्थी करत आहेत.
महाराष्ट्रातील अनेक डि.एड.बी.एड पात्रताधारक शिक्षक पात्रता परिक्षेच्या अटीनमुळे नोकरीविना वंचित असून येणाऱ्या परिक्षेला पोहचन्यासाठी अपयश आल्यास खूप मोठे नुकसान होणार आहे. सदर परीक्षा वेगवेगळ्या कारणांसाठी तब्बल तीन वेळा पुढे धकलण्यात आली आहे. पण यंदाच्या परीक्षा वेळापत्रकाला प्रवासाची मोठी अडचन निर्माण झाली आहे. जर परीक्षा घेतली गेली तर अनुपस्थित विद्यार्थ्यांना याची फार मोठी किंमत चुकती करावी लागणार आहे.म्हणून परीक्षा परिषदेने तातडीने निर्णय घेऊन भावी शिक्षकांना दिलासा द्यावा,ही प्रमुख मागणी परीक्षार्थी करत आहेत.
एस.टी.महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे खाजगी वाहतूकीची सध्याची भाडेवाढ सर्व सामान्यांना परवडणारी नाही. प्रत्येक परीक्षार्थी हा सधन कुटुंबातील नसल्याने परिक्षेला जाण्यासाठी यांना मोठा मानसिक आणि आर्थिक भुर्न्दड सहन करवा लागणार आहे. कारण खाजगी वाहतूक या गोष्टिचा विचार करून वारेमाप भाडे आकारुन शकतात.हे नाकारुन चालणार नाही. परीक्षा अगदी तोंडावर येवूनसुद्धा कोणताच निर्णय घेतला जात नाही. याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.मागील वेळी देगलूर मतदार संघाच्या पोट निवडणुकीसाठी सतर्कतेने वेळापत्रक बदल करणारी परीक्षा परिषद आता का मूग गिळून गप्प बसली आहे,हा यक्षप्रश्न उभा राहिला आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्याशी संपर्क साधन्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे संबंधित शालेय शिक्षण विभागाला यावर तोडगा काढण्याची मागणी तुषार देशमुख यांनी केले.
सध्या एस.टी कर्मचार्यांच्या संपामुळे बस बंद आहेत रविवारी परिक्षेला जाण्यासाठी अनेक खेडोपाड्यातून परिक्षार्थी येणार आहेत या गोष्टीचा परीक्षा परिषदेने गांभीर्याने विचार करावा याआधीही बिलोली देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीमुळे परीक्षा पुढे ढकलली जाते मात्र आता कोणताच निर्णय घेतला जात नाही ही भावी शिक्षकांची मोठी कुचेष्टा आहे येणाऱ्या शिक्षक पात्रता परिक्षेला अनेक महिला व मूली परीक्षार्थी बसणार आहेत वाहतुकीची मोठी गैरसोय होणार असल्याने पालक परिक्षेला पाठवण्यासाठी उत्सुक नाहीत. त्यामुळे खूप मोठे नुकसान होणार आहे, त्याकरिता राज्य परिक्षा परिषदेने तत्काळ मार्ग काढावा असेही युवाशाही संघटनेचे तुषार देशमुख यांनी केले.
भावी शिक्षकांची वाट बिकट! परिक्षा परिषदेची मनमानीमुळे शेकडो भावी शिक्षक टीईटी पासुन वचिंत राहण्याची शक्यता
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 19, 2021
Rating:
