सूरमाज फाऊंडेशन चोपडा यांचा कडून काढाचा वितरण

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

जळगाव : सूरमाज फाऊंडेशन चोपडा यांचा कडून चोपडा शहरात युनानी काढा पेयचे विनामूल्य वितरण केले गेले. ह्या काढाचा फायदा मालेगावच्या रूग्णांना झाला आहे आणि आजच्या साथीच्या रोगात, हा निरोगी राहण्याचा एक महत्त्वाचा मार्ग आहे.

सुरमाज फाऊंडेशन ने हा काढा गरीब आणि गरजू लोकांच्या घरी जाऊन वाटप केला आणि त्याच वेळी आपले कोरोना फायटर, पोलिस कर्मचारी, सिव्हील हॉस्पिटल चोपडा, नगरपालिका, कॉरंटिन सेंटर येथे ही वाटप करण्यात आला आणि सोबत लोकांना कोरोना विषाणूची माहिती देण्यात आली. 
हे सर्व करीत असताना सूरमाझ फाऊंडेशन चोपडाचे अध्यक्ष मोहम्मद उस्मान शेख, एस. बी. नाना, डॉ. मोहम्मद रागीब मोहम्मद उस्मान, अबुलिस शेख, झियाउद्दीन काझी, सद्दाम शहा, मुजाहिद शेख, अल्फिज कुरेशी, फैसल शेख मोईन कुरेशी आणि त्यांचे साथीदार उपस्थित होते.
सूरमाज फाऊंडेशन चोपडा यांचा कडून काढाचा वितरण सूरमाज फाऊंडेशन चोपडा यांचा कडून काढाचा वितरण Reviewed by सह्याद्री चौफेर on November 19, 2021 Rating: 5
Powered by Blogger.