सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
वणी : कुठल्याही धार्मिक पध्दतीचा वापर न करता एक प्रतिज्ञा घेऊन संपन्न केला. हा सहजीवन घोषणा सोहळा दि.१८ नोव्हेंबर २०२१ ला वणी येथील शेतकरी मंदिरात कुठल्याही अनिष्ट रुढी, परंपराचा व धार्मिक परंपराचा वापर न करता सर्वासमक्ष एक प्रतिज्ञा घेऊन घोष परिवाराने अर्नेस्टो व स्टॅलिन या आपल्या दोन मुलांचा सहजीवन सोहळा आणि नातीचा वाढदिवस सोहळा संपन्न झाला.
कोरोनाच्या काळात दोन्ही मुलाचे कोर्ट मॅरेज झाले होते,परंतु या साठी सर्वांना एकत्रित बोलविणे कठीण होते. सर्वासमक्ष मुलांनी लग्न केले हे घोष परीवाराला जाहिर करायचे असल्याने त्यांनी मुलांच्या सहजीवन सोहळयाची घोषणा व नातीचा वाढदिवस सोहळा आयोजित केला होता.
या प्रसंगी गेडाम सर म्हणाले की, गीत घोष हे परिवर्तन चळवळीतील मार्गदर्शक असून ते नेहमीच आपल्या विचार, त्याग आणि लढ्यातून समाजाला प्रगतिशील दृष्टिकोन देण्याचे काम करीत असतात, त्यांनी आयोजित केलेला हा सोहळा आम्हाला परीवर्नाची निश्चित दिशा देणारा आहे.
या नावीन्यपूर्ण सोहळ्यात विवाहिताकडुन प्रतिज्ञा वदन मा.उत्तमजी गेडाम मा.शिक्षणाधिकारी यांनी करुन घेतले. या सोहळ्याचे प्रास्ताविकपर भुमिका मा.गीत घोष यांनी केले, तर संचालन मा.वसंतराव चांदेकर सर यांनी केले.
मानवतेचा चेहरा असलेला सोहळा - उत्तम गेडाम
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 19, 2021
Rating:
