नगर परिषद वरोरा तर्फे बुद्ध भूमि चे खासदार बाळूभाऊ धानोरकर व नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांचा हस्ते भूमिपूजन संम्पंन्न
सह्याद्री न्यूज | कालू रामपूरे
वरोरा : नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांनी आपल्या वचनाची पूर्ति करत आज वरोरा शहरातील जत्रा मैदान येथील ऐतिहासिक बूद्ध भूमि ला संरक्षण भिंत बांधकाम या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
सुमारे तिन एकर परिसरात वसलेल्या बुद्ध भुमिला संरक्षण भिंत नसल्याने विविध सामाजिक कार्यक्रम घेतांना आयोजकांना अनेक अडचणी च्या समस्या उदभवत होत्या, त्यामुळे विविध संघटनांचे व सामाजिक कार्यकत्यांचे निवेदन नगराध्यक्ष यांना येत होते. सदर बाबीची दखल घेत जिल्ह्यातील वरोरा येथील नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या जत्रा मैदान येथील बुद्ध भूमी परिसरातील या ठिकाणी अणाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजने अंतर्गत बूद्ध भूमिचा खुल्या मैदानाला संरक्षण भिंत बांधकाम करणेया कामाचे भूमिपूजन बाळूभाऊ धनोरकर (खासदार-चंद्रपुर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्र), अहेतेशाम अली (नगराध्यक्ष न.प.वरोरा) यांचा हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख उपस्थिति- भंते धम्म सारथी, अनिल झोटिंग (उपाध्यक्ष न.प.वरोरा), सौ.राखी काळबांडे (नगरसेविका न.प.वरोरा), श्री.पंकज नाशिककर (नगरसेवक न.प.वरोरा), श्री.डॉ.गुनानंद दुर्गे (नगरसेवक न.प.वरोरा), सौ.चंद्रकला चिमुरकर(नगरसेविका न.प.वरोरा) उपस्थित होते. सोबतच सुनील वरखडे,बंडूभाऊ लभाने,मोनू चिमुरकर,विजय धोपटे,जयंत ठमके,प्रवीन चिमुरकर,यांचासह बहुद्देशीय पंचशील मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
भमिपूजन प्रसंगी खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी आपल्या संभाषणीय भाषणात सांगितले कि, वरोरा शहरातील संपूर्ण कार्यकाळामध्ये जे कोणी केले नाही, समाज बांधवांचा शब्दाला जपून धडपड करून नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांनी बौद्ध भूमिचा विकासासाठी जे कार्य केले ते ऊलेखनीय आहे. खा. धानोरकर यांनी नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांचे बूद्ध भूमिचा विकास कामाला मार्गी लावल्या बद्दल शुभेच्छा दिल्या.
नगर परिषद वरोरा तर्फे बुद्ध भूमि चे खासदार बाळूभाऊ धानोरकर व नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांचा हस्ते भूमिपूजन संम्पंन्न
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 19, 2021
Rating:
