पिरंजी येथे गावठी दारू विक्रेत्यावर उमरखेड पोलिस स्टेशनची धडाकेबाज कारवाई


सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 

उमरखेड : ग्रामपंचायत पिरंजी,गावकरी मंडळी,महिला बचत गट यांच्या वतीने दिनांक १२/१०/२०११ रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ यांना निवेदन देण्यात आले होते.

त्याचाच पडसाद म्हणून दिनांक १७/११/२०२१ रोजी उमरखेड पोलिस स्टेशनचे सहायक निरीक्षक बनसोडे मॅडम, बीट जमादार चव्हाण व जाधव यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत पदाधिकारी शंकर सुळ (उपसरपंच), ग्रामपंचायत सदस्य संतोष भवाळ, देवानंद पाईकराव,कृष्णा लोखंडे,तसेच दिगंबर मुरमुरे,सचिन वाहूळे,पांडुरंग डुकरे,अभिजीत आडे,महिला बचत गट सागरबाई दवणे,लता कांबळे,वनिता वाहुळे,सुभद्राबाई पठाडे,नंदाबाई ढोके,नंदाबाई पाईकराव व इतर महिला यांच्या समक्ष दारू विक्रेत्यावर खूप मोठी कारवाई पिरंजी येथे करण्यात आली. या कारवाईमध्ये मुद्देमाल पकडून दारू काढण्याचे साहित्य नष्ट करण्यात आले. या केलेल्या कारवाईवर समाधान व्यक्त करत पोलीस कर्मचाऱ्याचे महिला मंडळ मार्फत स्वागत करण्यात आले.
यावेळी बोलताना सहाय्यक निरीक्षक बनसोडे मॅडम यांनी महिला मंडळ व ग्रामपंचायत शब्द दिला आपल्या परिसरामध्ये जो कोणी दारू विकत असेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. या केलेल्या कारवाईवर ग्रामपंचायत, गावकरी व महिला समाधान व्यक्त करत आहे.
पिरंजी येथे गावठी दारू विक्रेत्यावर उमरखेड पोलिस स्टेशनची धडाकेबाज कारवाई पिरंजी येथे गावठी दारू विक्रेत्यावर उमरखेड पोलिस स्टेशनची धडाकेबाज कारवाई Reviewed by सह्याद्री चौफेर on November 19, 2021 Rating: 5
Powered by Blogger.