सह्याद्री न्यूज | रामचंद्र कामडी.
चिमूर : कुर्मी समाजाला ओबीसी मध्ये समावेश करण्यासाठी सतत प्रयत्न करीत असून येत्या अधिवेशनात हा विषय सभागृहात मांडण्यात येईल असा शब्द देत आमदार बंटीभाऊ भांगडीया म्हणाले की सभागृह बांधकाम करण्यासाठी १० लक्ष रुपये मंजूर असून निधी कमी पडत असेल त्यासाठी पुन्हा १५ लक्ष रुपयांची निधीची घोषणा करीत मोठा सभागृह उभारून सर्व ताे सामान्य नागरिकांना उपलब्ध करुन देण्यासाठी होईल.
विदर्भ क्षत्रिय कुर्मी समाज लुटी महाजन सभागृह बांधकाम उदघाटन प्रसंगी आमदार भांगडीया बोलत होते. यावेळी वसंत वारजूरकर, भाजप तालुका अध्यक्ष राजु पाटील झाडे, महिला आघाडी तालुका अध्यक्ष मायाताई ननावरे, किशोर सिंगरे, दिगंबरराव खलोरे , विकास बिरजे, आदीं उपस्थित होते.क्षत्रिय कुर्मी समाज लहान असला तरी आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी सभागृह बाधकाम साठी निधी दिला असून कुर्मी समाजातील विखुरलेल्या जाती एकत्रित करण्याचे काम सुरू आहे.
राज्यात कुर्मी समाजातील नेते कमी पडत असल्याने समस्या सुटत नाही. तेव्हा कुर्मी समाजाचे नेतृत्व आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी करण्याचे विवेक कापसे यांनी सांगून १० लक्ष निधीत पुन्हा निधी वाढवून देण्याची विनंती केली. लुटी महाजन बाबा मंदिर बांधकाम करण्यासाठी १ लाख ११ रुपये वर्गणी दान करण्याची घोषणा आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी केली. प्रास्ताविक प्रभाकर शीरभय्ये यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन विवेक कापसे यांनी केले.
उपस्थितीतांचे आभार नाना उर्फ ज्ञानेश्वर शीरभैय्ये यांनी मानले या वेळी अनेक समाज बांधव उपस्थित होते.
पिंपळनेरीच्या लुटी महाजन बाबा मंदिर सभागृह बांधकामाचे भूमिपूजन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 09, 2021
Rating:
