सह्याद्री न्यूज | किरण घाटे -
चंद्रपूर : मूल तालुक्यातील गोवर्धन येथील भाजपच्या सक्रिय भूतपूर्व सरपंच कल्पना बाबुराव खोब्रागडे यांचे सह अनेकांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये नुकताच प्रवेश केला. महाराष्ट्र राज्याचे बहुजन कल्याण, मदत पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.विजय वडेट्टीवार व चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी जि.प.अध्यक्ष संतोषसिंह रावत, बँकेचे संचालक संदीप गड्डमवार यांनी कांग्रेस मध्ये प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे दुपट्टा टाकून स्वागत केले. या शिवाय शशिकला परचाके, अमन खोब्रागडे, साहिल कडुकर, श्रवण मोहूर्ले, कवडू मशाखेत्री, अमित मशाखेत्री यानीही काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने त्यांचेही स्वागत कांग्रेस तर्फे करण्यांत आले.
यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती घनश्याम येनुरकर, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष व संचालक राकेश रत्नावार, तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष आणि कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, भेजगाव येथील सरपंच अखिल गांगरेड्डीवार, संचालक किशोर घडसे, ग्रामीण कांग्रेस नेते दीपक पाटील वाढई, ग्राम पंचायत सदस्य समीर काळे, गणेश खोब्रागडे, माजी सरपंच सुमित आरेकर, यांचेसह तालुका व शहर कांग्रेसचे पदाधिकारी व इत्तर कार्यकर्ते उपस्थित होते.
गोवर्धनच्या भूतपूर्व सरपंच कल्पना खोब्रागडेंसह इतरांचा कांग्रेसमध्ये प्रवेश
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 09, 2021
Rating:
