सह्याद्री न्यूज नेटवर्क |
वरोरा : एक पट्टेदार वाघ हरणाच्या कळपाचा पाठलाग करतांना थेट विहिरीत पडला. हे वृत्त सर्वत्र पसरताच परिसरातील नागरिक त्या दिशेने धाव घेतली.
वनविभागही त्या घटनास्थळी पोहचले. आणि तब्बल सहा तासाच्या अथक परिश्रमानंतर वाघाची विहिरीतून सुटका करण्यात यश आले.
विहिरीबाहेर निघताच वाघाने थेट जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. हे थरारक दृश्य तेथे जमलेल्या नागरिकांनी डोळ्यात साठवले. ही घटना वरोरा तालुक्यातील अल्फेर गावाच्या शिवारात सोमवारी सकाळी घडली.
वरोरा तालुक्यातील शेगाव उपवन क्षेत्रातील अल्फर गावाच्या शेतात बांधकाम केलेली विहिर आहे. सकाळी सहा वाजताच्या सुमारास पट्टेदार वाघ हरणाच्या कळपाचा पाठलाग करीत होता. कळप विहिरीच्या दिशेने धावत होता. मात्र, विहीर दिसताच, हरणाच्या कळपाने अचानक वळण घेतले. वाघाचे लक्ष कळपावर असल्यामुळे त्याला विहीर दिसली नाही. अशातच तो विहिरीत पडला. ही थरारक घटना शेतकरी संजय सरपाते यांनी स्वतः च्या डोळ्यांनी बघितली. ही माहिती वनविभागाला दिली. घटनेचे वृत्त पसरताच, वाघाला बघण्यासाठी हजारो लोकांची शेतात झुंबड उडाली. अखेर शेगाव पोलिसांना पाचारण करण्यात आले. वाघ पडलेल्या विहिरीत एक दोरखंड सोडण्यात आला. त्यानंतर दोरीच्या साह्याने पलंग विहिरीत सोडण्यात आला. वाघ त्या पलंगावर उभा झाला आणि त्याने विहितून थेट बाहेर उडी घेत जंगलाच्या दिशेने धूम ठोकली.
नागरिकात भीतीचे वातावरण :
तब्बल सहा तासानंतर वाघ विहिरीच्या बाहेर निघाला. अंदाजे तीन वर्षाचा हा नर असल्याचे बोलल्या जाते. वाघाचा वावर सध्या याच परिसरात असल्याने शेतकऱ्यांनी भीती व्यक्त केली आहे. सध्या शेतात कापूस वेचणी, चना व गव्हाची पेरणी सूरी आहे. परिणामी वाघ ज्या दिशेने गेला त्या परिसरात वनविभागाने गस्त वाढविली.
बाहेर निघताच त्या'ने ठोकली जंगलाच्या दिशेने "धूम"
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 09, 2021
Rating:
