डिजल भरण्याकरिता राज्य महामार्गावरील पेट्रोलपंपवर लागतात ट्रकांच्या लांबच लांब रांगा

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : वणी-घुग्गुस राज्य महामार्गावरील ब्राह्मणी फाट्याजवळ असलेल्या पेट्रोलपंपवर डिजल भरण्याकरिता तासंतास वाहनांची रांग लागून रहात असल्याने रहदारीला चांगलेच अडथळे निर्माण होत असून जैन ले-आऊट व आसपासच्या परिसरातील नागरिक त्यांचा जाण्या येण्याचा मार्ग हेरून उभ्या रहात असलेल्या या ट्रकांमुळे कमालीचे त्रस्त झाले आहेत. डिजल भरण्याकरिता रांग लाऊन उभे रहात असलेल्या या ट्रकांमुळे आसपासच्या परिसरात जाण्यायेण्याचे मार्गच बंद होत असल्याने येथील नागरिकांच्या ट्रक चालकांशी व पेट्रोलपंप व्यवस्थापकाशी नेहमी शाब्दिक चकमकी उडतांना दिसतात. डिजल भरण्याकरिता ट्रकांची लांबलचक रांग लागत असल्याने आसपासच्या परिसरात जाण्यायेण्याचा मार्गच या ट्रकांमुळे बंद होतो. त्यामुळे या मार्गाने जाणाऱ्या येणाऱ्यांची मोठी कोंडी होतांना दिसते. मार्ग हेरून उभे रहात रहात असलेल्या या ट्रकांमुळे कित्येक किरकोळ व मोठे अपघातही झाले आहेत. राज्य महामार्गावर डिजल भरण्याकरिता तासंतास ट्रकांची रांग लागून रहात असल्याने आसपासच्या परिसरातील नागरिक चांगलेच वैतागले आहेत. याबाबत त्यांनी वाहतूक विभागाकडे अनेकदा तक्रारीही केल्या आहे. परंतु पेट्रोलपंप धारकाचे साटेलोटे असल्याने ते निर्धास्त असल्याचे पाहायला मिळते. उलट नागरिकांशीच वाद घालून जे करायचे ते करा, असा पंप व्यवस्थापकाकडून दम देण्यात येतो. 
ब्राह्मणी फाट्याजवळ असलेला हा पेट्रोल अनेक कारणांनी नेमही चर्चेत असतो. डिजल भरण्याकरिता राज्य महामार्गाच्या विरुद्ध दिशेने ट्रकांची लांबच लांब रांग लागलेली असते. रस्त्यावर आडवे तिडवे ट्रक उभे केले जातात. डिजल भरल्यानंतर विरुद्ध दिशेने सुसाट ट्रक निघतात. रांग लागून रहात असलेल्या व विरुद्ध दिशेने सुसाट निघणाऱ्या या ट्रकांमुळे कित्येक छोटे मोठे अपघात झाले आहेत. आसपासच्या परिसरात जाण्याचे मार्ग हेरून हे ट्रक उभे रहात असल्याने नोकरी कामांवर जाणाऱ्या नागरिकांची चांगलीच कोंडी होतांना दिसते. एवढेच नाही तर पेट्रोल पंपाची हद्द सोडून ऐन रोडवर सकाळ पासून सायंकाळ पर्यंत वाहतूकदारांचे ट्रक उभे असतात. पेट्रोलपंप धारकाचे वाहतूकदारांना शय मिळत असल्याने ते ही पेट्रोपंपाजवळ अगदी रोडवर गाड्या उभ्या करून ठेवतात. राज्य महामार्गावर अशा प्रकारे तासंतास डिजल भरण्याकरिता आडवी तिडवी रांग लाऊन ट्रक उभे रहात असल्याने रहदारीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. विरुद्ध दिशेने रांग लाऊन उभे रहात असलेल्या व डिजल भरून विरुद्ध दिशेने सुसाट निघणाऱ्या ट्रकांमुळे कित्येक अपघात तर झालेच आहे. पण यानंतरही ट्रकांना शिस्त न लावल्यास या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. डिजल भरण्याकरिता ट्रकांची लांबचलांब रांग लागणार नाही, याची पेट्रोलपंप धारकाने दक्षता घेणे जरुरीचे आहे. रस्त्यावर आडवे तिडवे ट्रक लागणार नाही, व तासंतास रस्त्यावर ट्रक उभे राहणार नाही याचीही पेट्रोलपंप धारकाने काळजी घेणे जरुरी आहे. आसपासच्या परिसरातील नागरिकांना जाण्यायेण्यास अडथळे निर्माण होणार नाही, याकडे सुद्धा लक्ष देणे जरुरी आहे. परंतु या सर्व बाबीकडे पेट्रोलपंप धारक कानाडोळा करतांना दिसत आहे. डिजल भरण्याकरिता राज्य महामार्गावर ट्रकांची आडवी तिडवी रांग लागणार नाही, व रहदारीला अडथळे निर्माण होणार नाही, याची पेट्रोलपंप धारकाने दक्षता घेण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
डिजल भरण्याकरिता राज्य महामार्गावरील पेट्रोलपंपवर लागतात ट्रकांच्या लांबच लांब रांगा डिजल भरण्याकरिता राज्य महामार्गावरील पेट्रोलपंपवर लागतात ट्रकांच्या लांबच लांब रांगा Reviewed by सह्याद्री चौफेर on November 08, 2021 Rating: 5
Powered by Blogger.