तू एक दिवस निश्चितच ध्येय गाठशिल - इंजीनियर रितू लाेहकरे

सह्याद्री न्यूज | किरण घाटे

चंद्रपूर : शिक्षण हे वाघिनीचे दुध आहे आणि जाे शिक्षणाचं दुध पिताे ताे गुरगुरल्या शिवाय राहत नाही. "राणी" तुझ्या धाडसाला माझा सलाम ! तु एक दिवस जरुर यशाेदा मंदीराचा कळस गाठशिल अशी प्रतिक्रिया वर्धा जिल्ह्यातील वरुड येथील इंजीनियर रितू लाेहकरे या तरुणीने आज राणीच्या बाबतीत बातमी प्रकाशित झाल्या नंतर व्यक्त केली. रितू ही सध्या मध्यप्रदेश मधील भाेपाळच्या एका कंपनीत जॉब करीत आहे.
तेलंगणा राज्यातील राणी सुशिल राेहणे ही चंद्रपूरात येवून नियमितपणे सकाळी वृत्तपत्रे वाटुन आपले स्थानिक सरदार पटेल महाविद्यालयात बिए अंतिम वर्षाचे शिक्षण पूर्ण करीत आहे. उच्च शिक्षण घेवून स्पर्धा परीक्षा द्यायची व नाेकरी करायची असा तिचा मानस आहे. अनेकांनी शिक्षणाची जिद्द असलेल्या मेहनती राणीला पुढील शिक्षणासाठी शुभकामना व शुभेच्छा दिल्या आहे. ती महाराष्ट्रातील सहजं सुचलं महिला व्यासपीठाची एक सदस्या असून ही चंद्रपूर येथील किरायाची रुम करुन मैत्रिंनी साेबत राहत आहे.
तू एक दिवस निश्चितच ध्येय गाठशिल - इंजीनियर रितू लाेहकरे तू एक दिवस निश्चितच ध्येय गाठशिल - इंजीनियर रितू लाेहकरे Reviewed by सह्याद्री चौफेर on November 08, 2021 Rating: 5
Powered by Blogger.