सुंगधित तंबाकु विक्रेत्यांवर चंद्रपूर पाेलिसांच्या धाडी, ७४ हजारांचा माल जप्त


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर :  जिल्ह्यातील चिमूर तालुका अंतर्गत येत असलेल्या नेरी व (खुटाळा माेकासा) येथे चंद्रपूर एलसीबीच्या एका पथकाने नुकत्याच सुगंधित तंबाकु विक्रेत्यांवर माेठ्या शिताफीने धाडी टाकुन एकंदर ७४ हजार ६०० रुपयांचा माल हस्तगत केल्याचे वृत्त आहे. या बाबत पाेलिसांनी नेरी येथील रमेश गंगाधर बनकर व खुटाळा माेकासा येथील पंढरी किसन सुरकर यांचे वर भादंवि कलम १८८, २७३ अन्न सुरक्षा मानके कायद्या अंतर्गत कलम ५९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
या धाडीमुळे सुगंधित तंबाकु विक्रेत्यांचे अक्षरश: धाबे दणाणले आहे. या पुर्वी सुध्दा पाेलिसांनी जिल्ह्यात अश्या प्रकारच्या यशस्वी कारवाया केल्या आहे.
सुंगधित तंबाकु विक्रेत्यांवर चंद्रपूर पाेलिसांच्या धाडी, ७४ हजारांचा माल जप्त सुंगधित तंबाकु विक्रेत्यांवर चंद्रपूर पाेलिसांच्या धाडी, ७४ हजारांचा माल जप्त Reviewed by सह्याद्री चौफेर on November 08, 2021 Rating: 5
Powered by Blogger.