सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
वणी : जैताई मंदिर, व जैताई अन्नछत्र मंडळाने आपली भाऊबीज दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ग्रामीण रुग्णालयात साजरी केली.
ग्रामीण रुग्णालयात दाखल असलेल्या व दिवाळीच्या आनंदापासून वंचित असलेल्या सर्व भगिनींना देवस्थानच्या वतीने साडी, ब्लाऊज पीस,मिठाई व बिस्कीट पुडा देऊन त्यांच्या चेहऱ्या वर आनंद फुलविण्यात आला. मिठाई व बिस्कीट पुडे स्नेहा घी भंडार च्या सौजन्याने देण्यात आले.
या प्रसंगी माधव सरपटवार, मुन्नाभाऊ तुगनायत, मुन्नाभाऊ पोद्दार, नामदेव पारखी, प्रमोद वासेकर, वाल्मिक बावणे, दिवाण फेरवानी, प्रशांत महाजन, सुरेश मांडवकर, रविंद्र पाराशर, मयूर गोएंका, उत्तम गिरसावळे यांची उपस्थित होते.
जैताईची भाऊबीज ग्रामीण रुग्णालयात
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 08, 2021
Rating:
