सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : मूल येथील मूळ रहिवाशी परंतु सध्या भद्रावती येथे वास्तव्याने असणारी कु. शितल उर्फ छाेटी मरस्काेल्हे या तरुणीचा काल रविवारला रात्री आकस्मिकरित्या मृत्यू झाल्याची दुखद घटना घडली. कु शितल धनंजय मरस्कोले या ३० वर्षीय तरुणीची दि.७ नोव्हेंबरला अचानक तब्येत बिघडल्याने चंद्रपूरच्या नगराळे हॉस्पिटलला भरती करण्यात आले. परंतु उपचार करुन ही शितलच्या प्रकृतीने साथ न दिल्यामूळे त्याच दिवशी तिची रात्रौ ११ वाजता रुग्णालयात प्राणज्याेत मालवली. नंतर लगेच तिचे पार्थिव तिच्या मूल निवासस्थानी हलविण्यात आले आज साेमवार दिनांक ८ नोव्हेंबरला दुपारी १ वाजता उमा नदीच्या पात्रात तिच्यावर अत्यंसंस्कार करण्यात आले.
शितलच्या आकस्मिक मृत्यूने मूल व भद्रावती परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मरस्काेल्हे कुटुंबात ती सर्वांची लाडाची हाेती. तिचे वडील तीन महिण्यापुर्वीच आराेग्य पर्यवेक्षक पदावरुन सेवानिवृत्त झाले हाेते. तर शितलचा भाऊ सुरज मरस्काेल्हे हा डॉक्टर आहे.
शितल च्या आकस्मिक मृत्यूने सारेच हळहळले..
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 08, 2021
Rating:
