सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी : वणी-घुग्गुस राज्य महामार्गावर असलेल्या पेट्रोलपंपवर डिजल भरण्याकरिता वाहनांची रांग लागत असल्याने वाहतुकीला तर अडथळे निर्माण होतच आहे. शिवाय आसपासच्या परिसराकडे जाणारे रस्तेही या वाहनांमुळे बंद होत असल्याने या मार्गाने जाणे येणे करणाऱ्या नागरिकांचा चांगलाच मनःस्ताप होतांना दिसत आहे. डिजल भरण्याकरिता या पेट्रोलपंपवर कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकांची लांबच लांब रांग लागलेली असते. एकमेकांच्या पाठीमागे अगदीच जवळजवळ ट्रक उभे केले जात असल्याने या मार्गाने जाणे येणे करतांना नागरिकांना चांगल्याच अडचणी निर्माण होत आहे. नागरिकांनी जाण्यायेण्याचा रस्ता सोडून ट्रक उभे करण्यास सांगितल्यास त्यांच्याशीच अरेरावी केली जाते. नोकरी कामांवर दुचाकीने जाणाऱ्या नागरिकांची तर मार्ग हेरून उभे राहणाऱ्या या ट्रकांमुळे चांगलीच कोंडी होतांना दिसते. या पेट्रोलपंपवर डिजल भरण्याकरिता ट्रकांची आडवी तिडवी रांग लागत असल्याने या ठिकाणी नेहमी वाहतूक जाम होतांना दिसते. या पेट्रोलपंपवर डिजल भरण्याकरिता तासंतास ट्रकांची रांग लागून रहात असल्याने आसपासच्या परिसरातील नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. त्याचप्रमाणे या पेट्रोलपंपच्या बाजूला अगदी रस्त्यावर दिवसभर ट्रक उभे राहतात. विरुद्ध दिशेने सुसाट निघणाऱ्या या ट्रकांमुळे कित्येक दुचाकीधारकांना अपघातही झाले आहेत. तरीही या पेट्रोलपंपावर डिजल भरण्याकरिता रस्त्यावर लागणारी रांग मात्र शिस्तीत आली नाही. कितीही तक्रारी केल्या तरी कुणी काही बिघडवू शकणार नाही, अशी या पेट्रोलपंप व्यवस्थापकाची धारणा झाली आहे. डिजल भरण्याकरिता रांग लाऊन राहणारे ट्रक डाल्यामध्ये रहात असलेला कोळसाही रस्त्यावरच खाली करतात. त्यावरून वाहने जाणेयेणे करित असल्याने त्या कोळशाची भुकटी तयार होऊन पेट्रोलपंपा पासून काही अंतरापर्यंत नेहमी काळी धूळ उडतांना दिसते. डिजल भरण्याकरिता राज्य महामार्गावर ट्रकांची आडवी तिडवी रांग न लागू देता मोजक्या गाड्या बोलावून त्यामध्ये डिजल भरत गेल्यास सर्वांसाठीच ते सोयीस्कर ठरू शकते. थोडी थोडकी वाहणे बोलावून डिजल भरल्यास रहदारीलाही अडथळे निर्माण होणार नाही व वाहतुकीचीही कोंडी होणार नाही. राज्य महामार्गावरिल या पेट्रोलपंपवर डिजल भरण्याऱ्या ट्रकांमुळे इतरांना त्रास होणार नाही, याची पेट्रोलपंप धारकाने दक्षता घेण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
';
(function() {
var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true;
dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js';
(document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq);
})();