दगडाने जिल्हा परिषद सदस्याला मारहाण, वेगाव येथील घटना

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
मारेगाव : मारेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वेगाव बोटोणी सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य अनिल देरकर यांना क्षुल्लक कारणाने मारहाण करण्यात आली. सकाळी सव्वा नऊ च्या दरम्यान घडली आहे.

समोर आलेल्या वृत्तांनुसार जिल्हा परिषद सदस्य अनिल देरकर हे वेगाव येथे रस्त्याच्या कडेला उभे असतांना मारेगाव कडुन येणाऱ्या तरुणाला नमस्कार केला असता, त्याने संतापून जिल्हा परिषद सदस्य अनिल देरकरांवर दगड उचलत भिरकावला यात त्यांच्या डोक्याला व कानालगत जबर दुखापत झाली.

जि प सदस्य अनिल देरकर यांना मारेगाव ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार करून पुढील उपचाराकरीता चंद्रपूर येथे हालविण्यात आल्याचे कळतेय..दरम्यान घटनास्थळावरून संशयित तरुणाने पोबारा केला असून वृत्त लिहीपर्यंत पोलीस तक्रार झाली नव्हती.
दगडाने जिल्हा परिषद सदस्याला मारहाण, वेगाव येथील घटना दगडाने जिल्हा परिषद सदस्याला मारहाण, वेगाव येथील घटना Reviewed by सह्याद्री चौफेर on November 05, 2021 Rating: 5
Powered by Blogger.