टॉप बातम्या

मारेगाव : हिवरीत एकाला मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
मारेगाव : मारेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या हिवरी (पोड) येथील एकास हात उसणे घेतलेले पैसे का देत नाहीस? असे म्हणत डोक्यात काठीने मारहाण करण्यात आली.

या प्रकरणात एक जखमी झाल्याने जखमी अवस्थेत त्याने मारेगाव पोलीस ठाणे गाठत तिघांविरुद्ध (ता.४ नोव्हें.) रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. जखमी प्रविण काळे यास ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, काल गुरुवारीला संध्याकाळी तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
 
प्रविण शायनिक काळे (३०) रा.हिवरी (पोड), असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. पोलिस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार हिवरी पोड येथील प्रविण काळे याने गावातील नात्याने मामा लागत असलेल्या वसंता घोसले यांचे कडून हात उसने पैसे घेतले होते. उसने घेतलेले पैसे का देत नाहीस? म्हणून वसंत घोसले, दिलीप घोसले, तिरंत घोसले या तिघांनी घरी जावुन प्रविण काळे याला काठीने मारहाण केली. त्यात तो जखमी झाला.    
या घटनेबाबत प्रविण काळे यांंच्या फिर्यादीवरुन आरोपी वसंता घोसले, दिलीप वसंता घोसले, तिरंत वसंता घोसले यांचे विरोधात कलम ३०७, भांदवि नुसार गुरुवारी संध्याकाळी गुन्हे दाखल करण्यात आले असून, आरोपिंना अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास मारेगाव करित आहे.

Previous Post Next Post