सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
मारेगाव : कला, वाणिज्य व विज्ञान महा. मारेगाव येथील रा.से.यो व शारीरीक शिक्षण विभागाकडू संविधान दिन साजरा करण्यात आला.
संविधानामुळे भारताचे जागतिक महासत्ता होण्याचे स्वप्न पूर्ण होईल असे विचार कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. सिद्धराम मुंडे यांनी व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. अविनाश घरडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना उच्च शिक्षणाचे महत्व सांगितले. तर डॉ. गजानन सोडनर यांनी संविधानातील मूलभूत हक्क व न्यायिक पुनर्विलोकन या विषयी मार्गदर्शन केले. तसेच संविधान उद्देशपत्रीकेचे वाचन प्रा. विजय भगत यांनी केले. याच बरोबर संविधान दिनानिमित्त घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान परीक्षेचे बक्षीस वितरण सुद्धा करण्यात आले.
या वेळी स्पर्धेत प्रथम क्रमांक सायली आसूटकर, बी. ए. भाग १, द्वितीय क्रमांक अंकिता पावडे बी. ए. भाग ३ तर तृतीय क्रमांक नीरज महातले बी. एस सी भाग २ या विद्यार्थ्यांना मिळाले. सदर कार्यक्रमाचे आयोजन रा.सो.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. बाळासाहेब देशमुख व शारीरीक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. नितेश राऊत यांच्या संयुक्त विद्यमाने झाले.
या प्रसंगी मंचावर डॉ. माधुरी तानूरकर, डॉ. विनोद चव्हाण उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रवीण कुलकर्णी तर आभार डॉ. नितेश राऊत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीकरिता प्रा. शैलेश कांबळे, डॉ. घोडखांदे मॅडम, डॉ. चिरडे सर, डॉ. अडसरे सर, प्रा. माकडे सर, प्रा. आत्राम सर, प्रा. जेनेकर सर, प्रा. वांढरे सर, डॉ. कांबळे मॅडम, आदींनी मेहनत घेतली.
राष्ट्रीय सेवा योजना व शारीरिक शिक्षण विभागाकडून संविधान दिन साजरा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 27, 2021
Rating:
