सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदणखेडे
वणी येथे आंबेडकर चौकातून सुरु झालेली ही दौड स्पर्धा शिवाजी महाराज चौक व कृषी उत्पन्न बाजार समिती पासून परत आंबेडकर चौक अशी घेण्यात आली. क्रीडा अधिकारी मालेकर व बेलेकर गुरुजी यांचं या स्पर्धेला योग्य मार्गदर्शन लाभलं. ऍड. राहुल खापर्डे यांनी निळी झंडी दखविल्यानंतर ही दौड सुरु झाली. या स्पर्धेत प्रथम पुरस्कार प्रवीण लांडे चंद्रपूर यांनी, द्वितीय पुरस्कार रोहित येलादे वणी तर तृतीय पुरस्कार प्रविण जाधव वणी यांनी पटकावला. महिला गटातून प्रथम पुरस्कार वैष्णवी भुरसे, द्वितीय पुरस्कार रेणुका वसाके तर तृतिय पुरस्कार राणी शेंडे यांनी प्राप्त केला. संत रविदास महाराज चर्मकार युवा मंच हे या स्पर्धेचे संयोजक होते.
राजूर येथे संविधान दौड स्पर्धेअंतर्गत शहिद भगत सिंग चौक ते दीक्षाभूमी अशी ही दौड लावण्यात आली. सरपंच विद्याताई पेरकावार, जी.प. सदस्य संदीप भगत व अशोक वानखेडे यांनी निळी झंडी दाखविल्यानंतर या दौड स्पर्धेची सुरुवात झाली. या स्पर्धेत एकूण ३८ स्पर्धकांनी सहभाग घेतला. त्यातून क्रिश विश्वकर्मा राजूर याने प्रथम, प्रवीण लांडे चंद्रपूर याने दुसरा तर आकाश ठमके वणी या स्पर्धकाने तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार पटकावला. तसेच सुबोधी सुशील अडकिने व प्रज्वत फुलझेले या चौदा वर्षांच्या मुलांनी उत्कृष्ठ दौड लावल्याने त्यांना प्रोत्सानपर बक्षिसे देण्यात आली. बक्षीस वितरण सरपंचा विद्याताई पेरकावार, जी.प. सदस्य संदीप भगत व माजी सरपंचा प्रणिता मो. असलम यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता ब्लू व्हिजन राजूर शाखेने विशेष सहकार्य केले.
संविधान दिना निमित्त वणी व राजूर येथे घेण्यात आली संविधान दौड स्पर्धा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 27, 2021
Rating:
