सह्याद्री न्यूज नेटवर्क |
वणी : भार देश हा संविधान स्विकारण्यापुर्वी ब्रिटिश आश्रित पुरोहितशाहिच्या जबड्यात अडकलेला होता. २६ जानेवारी १९५० ला भारतदेशाने संविधान स्विकारुन सार्वभौमिक प्रजासत्ताकाचा स्विकार करुन या देशातील पुरोहित शाहीला झुगारुन दिले.
सार्वभौम लोकशाहीचा स्विकार केला. त्यामुळे भारतीय संविधान हा कुठलाही ग्रंथ नसून तो मानवी दास्यत्व व शोषण मुक्तिचा कायदेशीर आदेशनाम असल्याचे प्रतिप्रादन ट्रायबल आखाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा, अ.भा.संवैधानिक हक्क परिषचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. गीत घोष यांनी महाराष्ट्र ट्रायबल आघाडीद्वारा आयोजित संविधान दिन तथा तथा शामादादा कोलाम यांचे जयंती दिनानिमित्य केले.
२६ नोव्हेंबर २०२१ ला भिमालपेन भिवसन देव देवस्थानाच्या प्रांगणात संविधान दिवस तथा शामादादा यांच्या जयंती अनुसंघाने या कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक ट्रायबल आघाडी द्वारा करण्यात आले होते, त्या निमीत्य ते बोलत होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष ट्रायबल आघाडी तथा अ.भा.संवैधानिक हक्क परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.गीत घोष होते तर, मुख्य मार्गदर्शक म्हणून ट्रायबल आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मा.संतोषजी भादिकर हे होते तर,मुख्य अतिथि म्हणून मा. सौ.मंथनाताई सुरपाम, अशोकजी बेसरकर हे होते. सर्व प्रथम कोरोनामुळे ज्यांना आपला प्राण गमवावा लागला. अशा योध्यांना श्रधांजली यावेळी अर्पण करण्यात आली.
या प्रसंगी यांनीही मार्गदर्शन केले.
पुढे बोलतांना घोष म्हणेल की, भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास लिहणारे हे ब्रम्हण्यवादी दृष्टिकोनाचे व चातुर्वर्ण्य व्यवस्थेचे इतिहासकार असल्याने त्यांनी सर्वहारा आदिवासी बहुजन समाजाच्या स्वातंत्र्य चळवळीतील इतिसाचे योगदान दुय्यम स्तरावर ठेवले. खरा इतिहास लोकांपासून दडवून ठेवला. त्यामुळे आपल्या देशात विषमतेची दरी अधिकाअधिक वाढली आहे. ते पुढे म्हणेल की, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आमच्या ह्रदयात या ब्राम्हणी व्यवस्थेने तिरस्काराची भावना जाणीवपुर्वक रुजविली आहे,ती जोपर्यंत आम्ही आमच्या ह्रदयातून काढुन टाकत नाही तो पर्यंत आम्ही स्वतंत्र जीवन जगू शकत नाही. शेवटी ते पूढे म्हणाले की, भारतीय संविधानाने आम्हा भारतीय नागरिकांना भारताचे, सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय; विचार, अभिव्यक्त्ती, विश्वास, श्रध्दा व उपासना याचे स्वातंत्र्य; दर्जाची व संधीची समानता व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आस्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा आपण निर्धापुर्वक करुया तरच संविधानावर येणारे धर्मांध व जात्यांध प्रवृतचे संकट आपल्याला रोखता येईल व आपल्या घटनात्मक अधिकारासह आपल्या आपला देश सुरक्षित ठेवता येईल.
कार्यक्रमाचे प्रस्थाविक प्रशांत जुमनाके,संचालन दत्ता गावंडे आणि आभार रमेश मडावी यांनी मानले.
हा कार्यक्रम यशश्वी करण्याकरीता मा. संतोष चांदेकर, भाऊरावजी आत्राम, भगवानजी आत्राम, संतोष पेंदोर, बाबाराव गेडाम, प्रशांत कुमरे, सुधाम गावंडे, रानू तूमराम, लक्ष्मणराजी सुरपाम, महेश आत्राम, दुर्वासजी कुळसंगे साहेब आदिनी घेतले.
भीमालपेन देवस्थान येथे संविधान दिवस साजरा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 27, 2021
Rating:
