भिमनाडा येथे गाय गोधन उत्सहात साजरा

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
झरी जामणी : माथार्जुन पासून १ किलोमीटर अंतरावर असलेल्या भिमनाळा येथील बिरसा देव वसलेला आहे. या ठिकाणी गेल्या शंभर वर्षापासून ही जत्रा भरत असून, या जत्रेचे वैशिष्ट्य म्हणजे गाय गोधनाच्या दिवशी या परिसरातील सर्व पशुधन  येथील बिरसा देवाची पूजा करून वाजत गाजत जनावरांना चरायला घेऊन जातात व यामुळे ठिकाणी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव आपल्या वेशभूषा मध्ये आदिवासी नृत्य करीत हा सण साजरा करतात. येथील नृत्य दृष्य पाहून कधी न नाचणाऱ्यांचे सुद्धा पाय थिरकतात.

झरी जामणी तालुका हा आदिवासी बहुल म्हणून ओळखला जातो. येथील पोड, गाव परिसरामध्ये मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करतात, असं म्हटले जात की ही परंपरा गेल्या एक शतकापासून या ठिकाणी साजरी केली जातेय. मात्र, गेल्या दोन वर्षांमध्ये देशात कोविड -19 संसर्ग असल्याने या ठिकाणचा सण साजरा होऊ शकला नाहीत,परंतु कोरोना लाट ओसरताच शासनाच्या शिथिलतेने या वर्षीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. 


भिमनाडा येथे गाय गोधन उत्सहात साजरा भिमनाडा येथे गाय गोधन उत्सहात साजरा Reviewed by सह्याद्री चौफेर on November 05, 2021 Rating: 5
Powered by Blogger.