राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा दि. १८ व १९ नोव्हेंबरला दाेन दिवशीय चंद्रपूर जिल्हा दाैरा

 
सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर : देशाचे नेते, माजी केंद्रीय कृषी मंत्री,आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे केन्द्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचा येत्या १८ व १९ नोव्हेंबरला चंद्रपूर जिल्ह्याचा दाेन दिवशीय दाैरा हाेणार असल्याची माहिती राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेन्द्र वैद्य यांनी आज दिली. 

जिल्ह्याच्या दौऱ्या निमित्त ते गुरुवार दि.१८ नोव्हेंबरला, तालुका क्रीडा संकुल मूल येथे शेतकरी,कामगार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ग्रामीण विभागाचा कार्यकर्त्यांचा भव्य मेळाव्यात दुपारी ३ वाजता प्रामुख्याने उपस्थित राहुन मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहे. या शिवाय शुक्रवार दि.१९ नोव्हेंबरला सकाळी १०.३० वाजता चंद्रपूर येथील जनता महाविद्यालयच्या प्रांगणात जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (ग्रामीण) च्या कार्यकारिणी बैठकीस शरदचंद्र पवार उपस्थित राहणार आहे.
दरम्यान मूल येथील कार्यक्रमात जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह माेठ्या प्रमाणात उपस्थित राहावे असे आवाहन चंद्रपूर राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी केले आहे.
राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा दि. १८ व १९ नोव्हेंबरला दाेन दिवशीय चंद्रपूर जिल्हा दाैरा राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा दि. १८ व १९ नोव्हेंबरला दाेन दिवशीय चंद्रपूर जिल्हा दाैरा Reviewed by सह्याद्री चौफेर on November 06, 2021 Rating: 5
Powered by Blogger.