झरी व खडकडोह मंडळाला अतिवृष्टीची आर्थिक मदत द्या - शेतकऱ्यांची मागणी


सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 
झरी : यंदा अतिवृष्टीमुळे तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या कापुस, सोयाबीन, तूर या मुख्य पिकांबरोबर इतरही पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे सरसकट मदतीची आवश्यकता असतांना ही ५ पैकी मार्थाजुन, शिबला, मुकुटबन हे ३ मंडळ अतिवृष्टीच्या मदतीस पात्र ठरवून खडकडोह आणि झरी हे मंडळातील ३५ गावातील शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित राहत आहे. त्यामुळे तेरा ग्रामपंचायतीत ग्रामसभेत ठराव घेऊन जिल्हा प्रशासनाकडे नुकसान ची मदत मागितली आहे.

यावर्षी सतत चा पाऊस पडल्यामुळे आमच्या मंडळात प्रमाणात पेक्षा जास्त अतिवृष्टी झाल्यामुळे आमच्या शेतातील पिकांची भरपूर नासाडी नुकसान झालेली आहे. तरी पण, अतिवृष्टी मधून आमचे झरी व खडकडोह वगळण्यात आले. हा आमच्यावर होत असलेला  मोठा अन्याय आहे. परिणामी आम्ही सर्व शेतकरी बांधव तुम्हाला विनती करतो की, झरी आणि खडकडोह मंडळ अतिवृष्टी च्या यादी मध्ये आमच्या मंडळाला समाविष्ट करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा अन्यथा आम्हाला सहकुटुंब उपोषणाला बसावे लागेल अशा आशयाचे निवेदन तहसीलदार गिरीश जोशी यांना (ता.१ नोव्हें.) ला देण्यात आले.
यावेळी निलेश येल्टीवार, सतिश नाकले, मारोती येडमे जिवन उलेमाले, सचिन डहाके, हरिदास गुर्जवार, व्यंकटेश कोडापे, राकेश गालेवार, प्रकाश राजकडकर, जिवन काळे, विकास मानकर, विनोद भोंग ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.
झरी व खडकडोह मंडळाला अतिवृष्टीची आर्थिक मदत द्या - शेतकऱ्यांची मागणी झरी व खडकडोह मंडळाला अतिवृष्टीची आर्थिक मदत द्या - शेतकऱ्यांची मागणी Reviewed by सह्याद्री चौफेर on November 03, 2021 Rating: 5
Powered by Blogger.