सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : उपराजधानी नागपूर स्थित "प्रभात याेग प्राणायाम शिबीर"गोरखेडे काॅमप्लेक्स सीमीनरी हिल नागपूर येथे चंद्रपूर जिल्ह्याचे भारत स्वाभिमानचे अध्यक्ष विजय चंदावार, पतंजली योग समितीचे संघटन मंत्री शरदजी व्यास , पतंजली योग समितीचे उपप्रभारी रमेशजी ददगल तथा भारत स्वाभिमान चंद्रपूरचे कोषाध्यक्ष मुरलीधर शिरभय्ये यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली.
या वेळी नित्य योग वर्ग मार्गदर्शिका, योग शिक्षिका तथा महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं महिला व्यासपीठाच्या मुख्य मार्गदर्शिका नागपूर निवासी मायाताई कोसरे यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पाहुण्यांनी त्यांचे या नित्य चालणां-या निःशुल्क प्राणायाम वर्गाचे मुक्तकंठाने काैतुक करीत त्यांचे पुढील कार्याला शुभेच्छा प्रदान केल्या. या वेळी विनोद झुंगरे याेग साधिका पूनम काेसरे, स्मिता झुंगरे, सुशिलाताई झुंगरे, साधना गर्ग, सोनु भुक्ते उपस्थित होत्या.
चंद्रपूर जिल्ह्यातील सास्ती येथे या पुर्वी मायाताई काेसरे यांनी नित्य याेगा प्राणायाम वर्ग चालविले आहे. विशेषत: त्यांचे या वर्गाला महिला व तरुणींचा उत्तम प्रतिसाद मिळताेयं! सहजं सुचलंच्या वाटचालीतही त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
नागपूरच्या याेग प्राणायाम शिबिराला चंद्रपूर जिल्ह्याच्या पदाधिका-यांची सदिच्छा भेट !
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 02, 2021
Rating:
