सह्याद्री न्यूज | योगेश मडावी
झरी : गेल्या चार दिवसांपासून माथार्जून परिसरामध्ये विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. परिणामी येथील "लाईट का जात आहे हे कळायला मार्ग नाही.
सतत पडणाऱ्या पावसामुळे घरामध्ये डासांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यात विजेअभावी पंखे बंद असल्याने अनेकांची झोपमोड होत आहे. या परिसरात विजेवर चालणारे पंप वापरले जातात, परंतु वीज खंडित होत असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी हातपंपावर धाव घ्यावी लागत आहे. माथार्जून परिसरामध्ये गेल्या चार दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. मध्यरात्रीपासून ते सकाळी बारा वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित होत आहे. एकदा वीज गेल्यानंतर आठ ते दहा तास पुरवठा सुरळीत होत नाही.
या कोरोनाच्या काळात सर्व सामान्य माणसाला वीज बिलाचे पैसे मोजावे लागले आहे. 2 वर्षापासून कोरोना मुळे सर्व सामान्य गरीब माणसाची आर्थिक परिस्थिती ढासळली असून, अशा कठीण काळात हाताला काम अद्यापही पाहिजे तसे मिळत नाहीये. मात्र, 2 ते 3 वर्षातील थकबाकी काही करून विज बिल भरावीच लागले आहे.
झरी जामणी तालुक्यातील माथार्जुन येथील चार दिवसापासून "बत्ती" गुल होत असून, रात्री 1 वाजता लाईट जात असून सकाळी 12 वाजता लाईट येत आहे. नेमकं रात्रीच लाईट जाण्याचे कारण समजत नसून या परिसरातील शेतकरी,शेतमजूर त्रस्त झाले आहे. गल्लोगल्ली अंधार असून, रात इकारी घराबाहेर पडायला एक प्रकारची भीतीच निर्माण झाली आहे.
विशेष उल्लेखनीय की, या गावात सबस्टेशन असूनही विजेचे लपंडाव सुरु आहे...
रात्री एकदा गेली का सकाळी 12 वाजताच येते?
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 03, 2021
Rating:
