नांदेड : देगलूर पोटनिवडणुकीत काँग्रेसचे जितेश अंतापूरकर विजयी

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
नांदेड : अतिशय प्रतिष्ठेची समजली जाणारी देगलूर बिलोलीच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जितेश अंतापूरकर यांचा विजय झाला होता. अनेत दिग्गज नेते इथे पाय रोवून उभे होते. अशोक चव्हाणांसाठी ही अतीशय प्रतिष्ठेची लढाई मानली जात होती. जितेश अंतापूरकर यांचा 41 हजार 933 मतांनी विजय झाला आहे. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या सुभाष साबणे यांना धूळ चारली आहे.
देगलूर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत उमेदवार निहाय मिळालेली मते अशी आहेत.

जितेश अंतापूरकर - 1,08,789

सुभाष साबणे - 66,872

डॉ. उत्तम इंगोले - 11,347

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांना 1,08,840 मते मिळाली आहेत. त्यांचे मताधिक्य 41933 एवढे आहे.
नांदेड : देगलूर पोटनिवडणुकीत काँग्रेसचे जितेश अंतापूरकर विजयी नांदेड : देगलूर पोटनिवडणुकीत काँग्रेसचे जितेश अंतापूरकर विजयी Reviewed by सह्याद्री चौफेर on November 03, 2021 Rating: 5
Powered by Blogger.