सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वामनराव कासावार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून खेळाडूंचा गौरव करतांनाच राष्ट्रीय खेळांना चालना मिळावी याकरिता आणखी भव्य स्वरूपात कबड्डी सामन्यांचे आयोजन करण्याचा मानस व्यक्त केला. रंगतदार ठरलेल्या अंतिम सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंनी चिव्वट खेळ खेळत सामना अतीतटीचा केला. हा रोमांचक सामना बघतांना प्रेक्षकही काही काळ स्तब्ध झाले होते. खेळाडूवृत्ती सिद्ध करित अखेर एस एस एन जे रेल्वे नागपूर या संघाने सामना जिंकत प्रथम क्रमांक पटकावला. तर विद्यार्थी मंडळ भद्रावती हा संघ उपविजेता ठरला. प्रथम बाजी मारणाऱ्या संघाला ३० हजार रुपये तर उपविजेत्या संघाला २० हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. तसेच तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या सुभाष क्रीडा मंडळ वडगाव (यवतमाळ) या संघाला १५ हजार रुपये तर चौथ्या क्रमांकावरील संघाला १० हजार रुपयांचे बक्षिस देण्यात आले. तसेच खेळाडूंना वयक्तिक कामगिरी करिताही अनेक बक्षिसे देण्यात आली. कबड्डी सामन्यांच्या या स्पर्धेमध्ये ४० संघांनी सहभाग घेतला होता. क्रीडा मंडळाचे मार्गदर्शक प्रा. दिलीप मालेकार व प्राचार्य रघुनाथ मोहिते यांचे या कबड्डी सामन्यांना मार्गदर्शन लाभले. या समारोपीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. दिलीप मालेकार यांनी केले. सूत्रसंचालन बेलेकर यांनी आभार प्रदर्शन किशोर बोढे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता श्रीकांत पोटदुखे, राकेश बुग्गेवार, सरोज मुन, मिलिंद खारकर, योगेश खारकर, अनिल राजगडकर, सुधाकर कोंगरे, सचिन पडाल, मंगेश क्षीरसागर, गणेश गोहोकार, मनोज भगवा, अनिकेत चिकटे, प्रशांत जोगी, राजू रिंगोले, अभय येरणे, यश येडमे आदींनी परिश्रम घेतले.
दोन दिवसीय कबड्डी सामान्यांचा समारोप सोहळा थाटात संपन्न
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 21, 2021
Rating:
