सह्याद्री न्यूज नेटवर्क |
मारेगाव : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा युवासेना च्या वतीने मच्छिन्द्रा येथे जननायक धरती आबा क्रांतिवीर बिरसा मुंडा यांचा १४६ वा जयंती उत्सव व सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय संवैधानिक हक्क परिषदचे राष्ट्रीय अध्यक्ष गीत घोष हे होते तर क्रांतीसुर्य बिरसा मुंडा युवासेना मच्छिन्द्रा च्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुक पाहूणे प्रमुख मार्गदर्शक मा. प्रा. श्री. विजय पंडित सर लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी हे होते. याप्रसंगी क्रांतीसुर्य महामानव भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या न्यायहक्कांसाठी ब्रिटिशांच्या विरोधात लढा उभारून देशसेवेसाठी आपला प्राण पणाला लावला म्हणून त्यांच्या बलिदानामुळे आजच्या तरुणांना नक्कीच समाजासाठी लढण्याची प्रेरणा मिळेल असा आशावाद पंडित सर यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस महापुरुषांच्या प्रतिमेसह बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार व फुलं अर्पण करत मान्यवरांनी अभिवादन केले. या कार्यक्रमास बेबीताई मेश्राम (सामाजिक कार्यकर्त्या), डॉ. प्रशांत पाटील (पोलीस पाटील मच्छिन्द्रा), पंढरीजी आत्राम (मा. पो. पा.), माजी सरपंचा तुळसा कुमरे, धनंजय आसूटकर (सामाजिक कार्यकर्ता), अमोल कुमरे (अक्षराज पत्रकार), कवी कैलास मेश्राम, संतोष पेंदोर यांची उपस्थिती होती.
या कार्यप्रसंगी गडचिरोली जिल्ह्यातील पारंपरिक आदिवासी लोककला सादर करण्यात आली. यावेळी गावातील युवक युवती महिला पुरुष बालक तसेच जेष्ठ नागरिक व सर्व समाज बांधव उपस्थित होते.
मच्छिन्द्रा येथे भगवान बिरसा मुंडा यांची जयंती उत्सहात साजरी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 16, 2021
Rating:
