सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी : नक्षली कमांडर मिलिंद तेलतुंबडेंवर लालगुडा येथे झाले अंत्यसंस्कार
नक्षली कारवायांचा मास्टरमाइंड असलेला मिलिंद तेलतुंबडेंचा झाला अखेर
कोरची तालुक्यातील मदनटोला जंगल परिसरात सी-६० कमांडो पथकाने सर्च ऑपरेशन राबवून २६ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. या जंगल परिसरात नक्षलवाद्यांचे शिबीर लागणार असल्याची गुप्तचर यंत्रणेकडून पोलिस दलाला माहिती मिळाल्यानंतर हे सर्च ऑपरेशन राबविण्यात आले. पोलिसांकडून कंठस्नान मिळालेल्या २६ नक्षलवाद्यांमध्ये नक्षल मास्टरमाइंड मिलिंद तेलतुंबडे याचाही समावेश आहे. नक्षल कमांडर मिलिंद तेलतुंबडे हा तीन राज्यातील नक्षली झोनचा प्रमुख होता. मिलिंद तेलतुंबडे याच्या शिरावर ५० लाखांचे बक्षिस होते. तो मूळचा वणी तालुक्यातील राजूर (ईजारा) येथील रहिवासी असल्याने त्याच्यावर त्याच्या आप्तस्वकीयांच्या उपस्थितीत आज लालगुडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. हिंसक कारवायांनी विध्वंस घडवून आणणाऱ्या एका विघातक नक्षलवाद्याला कंठस्नान मिळाल्याने नक्षली चळवळीच्या पाठीचा कणाच मोडला आहे. २६ नक्षलवाद्यांना गोळ्या घालून ठार केल्याने सी-६० कमांडो पथकाची सर्वच स्थरातून प्रशंसा केली जात आहे.
नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांनी नेहमी जीव मुठीत धरून जगणाऱ्या नक्षल प्रभावित जिल्ह्यातील नागरिकांना २६ नक्षलवादी पोलिस चकमकीत ठार झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. एवढेच नाही तर तीन राज्यांचा नक्षली झोनचा प्रमुख मास्टरमाइंड असलेला नक्षली कमांडर मिलिंद तेलतुंबडे हा देखिल चकमकीत ठार झाल्याने नक्षली चळवळीच्या पाठीचा कणाच मोडला आहे. नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडे हा मुळचा वणी तालुक्यातील राजूर (ईजारा) येथिल रहिवासी असून तो उच्च शिक्षित होता. नंतर तो नक्षली चळवळीत सक्रिय झाला. कालांतराने तो नक्षल्यांचा मोरक्या बनून हिंसक कारवाया करू लागल्याने तो जहाल नक्षलवादी म्हणून कुप्रसिद्ध झाला. महाराष्ट्र, छत्तीसगड व मध्यप्रदेशातील पोलिस यंत्रणेच्या तो रडारवर होता. नेहमी पोलिसांना हुलकावणी देऊन तो एका राज्यातून दुसऱ्या राज्यात भ्रमंती करित होता. परंतु अखेर गुप्तचर यंत्रणेच्या माहिती वरून सी-६० पोलिस कमांडो पथकाने मदनटोला जंगल परिसरात सर्च ऑपरेशन करून या जहाल नक्षलवाद्याला गोळ्या घातल्या. सकाळी ६ वाजता पासून दुपारी ३.३० वाजेपर्यंत चाललेल्या या धुमश्चक्रीत २६ नक्षलवादयांचा पोलिसांनी खात्मा केला. गाव शहरात दहशत माजवून हिंसाचार घडवून आणणारे हे नक्षलवादी समाज विघातक असतात, नक्षलवाद्यांना समाजभावना नसते, ते केवळ विध्वंसक असतात. मिलिंद तेलतुंबडे हा नक्षली मूळचा वणी तालुक्यातील असल्याने त्याच्यावर लालगुडा येथे आप्तस्वकीयांच्या उपस्थितीत आज अंतिम संस्कार करण्यात आले. मास्टरमाइंड मिलिंद तेलतुंबडे याच्यासह २६ नक्षली पोलिस चकमकीत ठार झाल्याने ही आज पर्यंतची सर्वात मोठी कार्यवाही मानली जात आहे. एवढ्या मोठ्या संख्येने नक्षल्यांचा खात्मा करण्याची इतिहासातील ही पहिलीच कार्यवाही ठरली आहे. २६ नक्षल्यांना कंठस्नान घालणाऱ्या सी-६० कमांडो पथकाची ही जिगरबाज व प्रशंसनीय कार्यवाही आहे.
नक्षली कमांडर मिलिंद तेलतुंबडेंवर लालगुडा येथे झाले अंत्यसंस्कार
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 15, 2021
Rating:
