वायगांव शेत शिवारात आढळला मृत अवस्थेत वाघ - बघ्यांची जमली गर्दी !


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : जिल्ह्यातील भद्रावती तालुक्या अंतर्गत माेडत असलेल्या चंदनखेडा नजिकच्या वायगाव रस्त्यावरील रणदिवे यांच्या मालकीच्या शेतात आज गुरुवार दि.११नाेव्हेंबरला सकाळी ९ वाजताच्या दरम्यान एक वाघ मृत अवस्थेत आढळल्याची घटना समाेर आली आहे.
    
चंदनखेडा येथील शेत शिवारात अनेक दिवसांपासून वाघ असल्याची चर्चा या पुर्वि या परिसरात सुरू होती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अक्षरश: भितीचे वातावरण निर्माण झाले होते. अश्यातच आज वायगाव रस्त्यावरील शेतात वाघाचा मृतदेह पडून असल्याचे शेतावर जाणांऱ्या मजुरांना दिसुन आला.सदरहु घटनेची वार्ता या परिसरात वाऱ्या सारखी पसरताच घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी उसळली. तदवतचं गावकरी मंडळीकडुन उपराेक्त घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. दरम्यान वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी घटना स्थळी पाेहचले असल्याचे वृत्त आहे. .
वायगांव शेत शिवारात आढळला मृत अवस्थेत वाघ - बघ्यांची जमली गर्दी ! वायगांव शेत शिवारात आढळला मृत अवस्थेत वाघ - बघ्यांची जमली गर्दी ! Reviewed by सह्याद्री चौफेर on November 11, 2021 Rating: 5
Powered by Blogger.