घरपोच सातबारा पोहचवण्याची मोहीम सुरु

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

वरोरा : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात गुरुवारी मोफत डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा शेतकऱ्यांच्या घरी जाऊन वितरित करण्यात आला.
 
वरोरा येथील पटवारी विनोद खोब्रागडे यांनी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन शेतकऱ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. मात्र, अशातच सातबारा घरपोच मिळाल्याने शेतकरी सुखावला. तहसीलदार रोशन मकवाने व वरोरा उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांच्या आदेशानुसार वरोरा तालुक्यात शेतकऱ्यांच्या घरपोच सातबारा देण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.
अनेक वेळा शेतकऱ्यांना सातबारासाठी अनेक फेऱ्या माराव्या लागतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ व पैसा वाया जात आहे. या समस्येतून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी वरोरा महसूल विभागाने मोहीम सुरू केली आहे. पहिल्या दिवशी पटवारी यांनी एकूण 260 शेतकऱ्यांना सातबारा वाटप केले.
घरपोच सातबारा पोहचवण्याची मोहीम सुरु घरपोच सातबारा पोहचवण्याची मोहीम सुरु Reviewed by सह्याद्री चौफेर on November 11, 2021 Rating: 5
Powered by Blogger.