देवदारी
देवा तुझ्या दारी आली
धाया तुझी रे कराया
नको असा अंत पाहू आपले लेकरांचा
कशी तुझी रे माया कशी तुझी रे लीला
कोरोनाचा संकट असं जगावरी पाडीला ।।१।।
काय चूक झाली देवा कसा रे रुसला
या महामारी ने जीव रे घेतला
बापा वीन लेक झालं कस रे पोरका
काळजाच्या तुकड्याविना माय झाली पिसा ।।२।।
कुंकवाचा धनी गेला, आधार हरपला
संसाराची झाली दशा हा खेळ रे कसा
झालं देवा पूर झालं थांब तू आता ।।३।।
निर्दयी कसा झाला,
सांग देवा आता
डोळ्या मध्ये अश्रू माझ्या नाही पाहवत आता ।।४।।
देवदारी : देवा तुझ्या दारी आली धाया तुझी रे कराया
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 24, 2021
Rating:
