संतापलेल्या घरकुल लाभार्थ्यांने पंचायत समिती कार्यालय पेटविण्याचा केला प्रयत्न


सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
महागाव, (२४ ऑक्टो.) : महागाव पंचायत समीती कडुन सतत होत असलेली अवहेलना आणि घरकुल  योजनेचा लाभ  मिळत नसल्याने एका हाताने अपंग असलेल्या पिडीत लाभार्थी दीपक यादवराव पिसाळ  याने चक्क पेट्रोल टाकुण कार्यालय पेटविण्याचा प्रयत्न केला .परंतु कर्तव्यावर असलेले शिपायी संजय कदम व इलेट्रीक फीटींग करणाऱ्या  कामगारांनी त्या माथेफेरूला पकडल्यामुळे मोठा अनर्थ टळला . 

दगडथर येथील दिपक पीसाळ हे एका हाताने अपंग असुन त्यानी घरकुल, शौचालयासाठी पंचायत समितकडे अर्ज दाखल केला. परंतु पंचायत समिती कडुन कुठलाही शासकीय लाभ मिळत नसल्याने संतापलेल्या लाभार्थ्यांने चक्क! अर्धा लिटर पेट्रोल घेऊन पंचायत समितीच्या कार्यालयात प्रवेश केला. आणि कार्यालयातील कॉम्प्युटर, टेबल आणि लाकडी आलमारीवर पेट्रोल ओतले. माचीस घेऊन पेटवित असतांना उपस्थित असलेल्या शिपायी व कामगारांनी त्याला पकडले आणि मोठा अनर्थ टळला. घटनेची माहीती मिळताच महागाव पोलीस घटना स्थळी दाखल झाले व संबधीत माथेफीरूला ताब्यात घेऊन अटक केली.

या घटनेची माहीती मिळताच गटविकास अधिकारी गौतम ठाकुर यांनी कार्यालयाला भेट देऊन आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल केला . 




"गेल्या अनेक वर्षापासुन मी घरकुल व शौचालय करीता वारंवार मागणी केली. अर्जही दाखल केले. आमदार, खासदार, जि.प सदस्य, सरपंच यांना भेटुन आपबीती सागीतली .व घरकुल देण्याची मागणी केली .परंतु प्रत्येक ठीकाणा वरून नकार भेटला.एका इसमाने सांगीतले की तु पेट्रोल घेऊन पंचायत समित कार्यालयात जाऊन कार्यालय पेटविण्याचा प्रयत्न कर तेंव्हा तुला घरकुल भेटेल त्या सांगण्यावरून मी हे केले. अशी माहीती खुद्द दिपक पीसाळ यांनी पोलिसांना सांगीतले. पोलीस त्या इसमाचा शोध घेत आहे."
संतापलेल्या घरकुल लाभार्थ्यांने पंचायत समिती कार्यालय पेटविण्याचा केला प्रयत्न संतापलेल्या घरकुल लाभार्थ्यांने पंचायत समिती कार्यालय पेटविण्याचा केला प्रयत्न Reviewed by सह्याद्री चौफेर on October 24, 2021 Rating: 5
Powered by Blogger.