महामानव क्रांतिवीर बिरसामुंडा स्मारकाचे लोकार्पण सोहळा व खासदार बाळु भाऊ धानोरकर यांच्या जनसंपर्क कार्यालयचा उद्घाटन सोहळा
सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार
केळापूर, (२४ ऑक्टो.) : पांढरकवडा नगर परिषदे तर्फे क्रांतिवीर महामानव बिरसामुंडा चौक येथे उभारण्यात आलेल्या क्रांतिवीर महामानव बिरसामुंडा स्मारकाचा लोकार्पण सोहळा सम्पन्न झाला. यावेळी उदघाटक म्हणून महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळूभाऊ धानोरकर, अध्यक्ष म्हणून नगराध्यक्षा वैशालीताई नहाते, माजी शिक्षणमंत्री वसंतराव पुरके, माजी आमदार वामनरावं कासावार, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष टिकाराम कोंगरे, कृषीभूषण चालबर्डीकर पाटील, चंद्रपूर जिला परिषदेचे विरोधी पक्षनेते राजुरकर, जितेंद्र मोघे, प्रकाश कासावार, माजी नगराध्यक्ष संतोष बोरले, युवक काँग्रेस महासचिव शिनुअन्ना नालमवार,जि.प सदस्या सुचरीता पाटील, जि.प सदस्या वैशाली राठोड, पं.स सदस्य उज्ज्वला बोंडे,नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राजू मोट्टेमवार,नगरसेवक साजिद शरीफ, माजी नगराध्यक्ष भाऊराव मरापे,आदिवासी समाजसेवक वामनरावं सिडाम, अंकित नैताम,संभा मडावी, डॉ.तोडासे, वैद्यकीय अधिकारी मडावी यांच्या उपस्थिती सम्पन्न झाला. यावेळी विविध पक्षाचे नेते कार्यकर्ते उपस्थित होते.
स्थानिक शहिद नागेश्वर जिड्डेवार भवन येथे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार आणि कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आलेल्या सामान्य माणसाला आपल्या क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी जनसंपर्क कार्यालयचा उद्घाटन करण्यात आले, असे धानोरकर आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, सध्याचे मोदी सरकार हे सामान्य माणसाला महागाई मध्ये ढकलून दिलं आहे, सामान्य लोकांना आपलं बजेट कोलमडले आहे. शेतक-यांना आत्ता झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे त्याचा लाभ साठी ते सरकारला मागणी करणार असल्याचे सांगितले. तसेच आपल्याला कॉंग्रेस पक्षा शिवाय दुसरा पर्याय नाही असे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार आणि कार्यकर्ता मेळाव्यात सांगितले.
सर्व प्रथम भाषणाची सुरवात बाळासाहेब उर्फ जितेंद्र मोघे यांनी सुरवात केली. व त्यानंतर नुकतेच काँग्रेस मध्ये प्रवेश घेतलेले पांढरकवडा येथील माजी नगराध्यक्ष संतोष बोरले यांनी सुरवात केली काँग्रेस पक्षात घरवापसी झाली असून काँग्रेस पक्ष तालुक्यात प्रत्येक घरा घरात पोहचवण्याचा काम करु व ते समोर म्हणाले की येथील भाजपच्या राजकीय लोकप्रतिनिधीनी रोजगार हमी योजनेत ५४ कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला असुन त्याची तक्रार करणारा हाच संतोष बोरले आहे असे, बोरले यांनी यावेळी ठणकावून सांगितले व त्या प्रकरणातील दोषींना कारावास भोगावा लागेल असे आपल्या भाषणातून सांगायला विसरले नाही या कार्यक्रमाला सर्व सर्व काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
महामानव क्रांतिवीर बिरसामुंडा स्मारकाचे लोकार्पण सोहळा व खासदार बाळु भाऊ धानोरकर यांच्या जनसंपर्क कार्यालयचा उद्घाटन सोहळा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 24, 2021
Rating:
