जीवनातील सकारात्मक बदल होऊन त्यांनी समाधान जीवन जगावे : केअर इंडिया

सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
केळापूर, (२४ ऑक्टो.) :
गॅप इन्क यांच्या अर्थसहाय्य व्दारे केअर इंडिया संचालित वुमन+वाटर प्रकल्पाअंतर्गत महिलांची व्यक्तिगत प्रगती व कारकीर्द विकास व्हावा त्यासाठी जीवनातील सकारात्मक बदल होऊन त्यांनी समाधान जीवन जगावे. याकरिता केअर इंडिया संस्थेद्वारे गावातील महिला यांना व्यक्तिमहत्त्व विकास होण्यासाठी संवाद, स्वच्छता, समस्या चे निराकरण करणे, ताण आणि वेळ व्यवस्थापन, आर्थिक साक्षरता, स्वच्छता करिता पतपुरवठा, या विषयी मोफत प्रशिक्षण दिले जात आहेत. महाराष्ट्रातील चालू असलेल्या प्रकल्पाचे ऑपरेशन मॅनेजर रविकांत घाटोळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धा जिल्हा व यवतमाळ जिल्हा या दोन जिल्ह्यात कार्य सुरू आहेत. केअर इंडिया ही एक जागतिक स्तरावर कार्य करणारी संस्था असून जी शिक्षण, आरोग्य, उपजिवीका व आपत्ती व्यवस्थापन या चार प्रमुख्य घटकावर कार्य करत आहेत.    
        
सध्या कोरोना महामारी सुरू आहेत, पण ज्या व्यक्तींनी केयर इंडिया संस्थेचे प्रशिक्षण घेतले आहेत ते सर्व आपल्या जीवनातील योग्य दृष्टीकोन, विचार व आवश्यक ज्ञानाचा उपयोग करतच आहेत. परंतु लोकांमधील जे लसीकरण बाबत वेगवेगळ्या प्रकारचे गैरसमज हे कोरोना महामारीमध्ये पसरलेले होते पण ते सुद्धा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न जनजागृती व क्रियाकलाप च्या माध्यमातून आमचे प्रशिक्षक टीम कार्य करीत आहेत.
     
आज 22 ऑक्टोबर 2021 ला केळापूर तालुक्यातील प्रशिक्षणार्थी व पेस तसेच मेल चॅम्पियन साठी इंटरफेस मीटिंग चे आयोजन राम मंदिर येथे करण्यात आले होते. ज्याचा उद्देश चॅम्पियन व सरकारी यंत्रणा सोबत चर्चा व्हावी व त्यांचे प्रश्न सोडविण्यास त्यांना मदत व्हावी.

या मिटींगला अध्यक्ष प्रतिभा दुर्गे मॅडम महिला समुपदेशन अधिकारी तसेच महिला व पाणी प्रकल्प महाराष्ट्र राज्याचे ओपेशनल मॅनेजर रविकांत घाटोळ सर, MEO सुनील मानकर सर, रेजिवार सर गटविकास अधिकारी, PSI कानबाले मॅडम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ मडावी सर, पाणी व स्वच्छता अधिकारी शेंडे सर, पेसा समन्वयक विणकरे सर, आदर्श ग्रामसेवक प्रकाश काकडे सर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारक सूरज चौधरी सर, केळापूर तालुक्याचे क्षेत्र समनव्यक अमोल बोरकर सर व खडसे सर सदर मान्यवर उपस्थित होते. तसेच मारोती वेलादे सर, ज्ञानदेव शेंडे सर, मारोती वाढई सर, विजय कोडापे सर, संदीप मेश्राम सर, उमेश कुडमथे सर, रोहित मरसकोल्हे सर, अर्पणा मालिकर ताई, वर्षा कैटिकवार ताई, सुनीता ताई गेडाम, लक्ष्मी ताई आत्राम उपस्थित होते केअर चे सर्व प्रशिक्षणार्थी व कम्युनिटी मोबिलायझर इत्यादी व्यक्ती उपस्थित होते, हे करत असताना कोरोना महामारी संबंधित सर्व नियमांचे पालन करून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.
जीवनातील सकारात्मक बदल होऊन त्यांनी समाधान जीवन जगावे : केअर इंडिया  जीवनातील सकारात्मक बदल होऊन त्यांनी समाधान जीवन जगावे : केअर इंडिया Reviewed by सह्याद्री चौफेर on October 24, 2021 Rating: 5
Powered by Blogger.