सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (२४ ऑक्टो.) : चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणा-या राजूरा तालुक्यातील रामपूर येथे आज रविवार दि. 24 ऑक्टाेंबरला श्रमदानाचा कार्यक्रम पार पडला. या श्रमदान कार्यक्रमाला चंद्रपूरचे विद्यमान जिल्हाधिकारी अजय गुल्हाने उपस्थित हाेते. त्यांचे प्रमुख उपस्थितीत चंद्रपूरचे निवासी जिल्हाधिकारी तथा राजूरा उपविभागीय अधिकारी खलाटे, उपविभागीय वन अधिकारी अमाेल गर्कल तदवतचं तहसीलदार, वन परिक्षेत्र अधिकारी, संरक्षण पथक, तालुका कृषिअधिकारी या परिक्षेत्रातील सर्व वन कर्मचारी,वनमजुर, महसूल कर्मचारी, कृषी विभागाचे कर्मचारी, सर्प मित्र चमू आदींनी राजुरा परिक्षेत्रामधील रामपूर नियातक्षेत्रातील कक्ष क्र. 153 मध्ये बारमाही नाल्यावर दोन ठिकाणी श्रमदानातुन आज वनराई बंधाऱ्यांची निर्मिती केली.
राजूऱ्यात वनराई बंधाऱ्यांची निर्मिती, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांची उपस्थिती
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 24, 2021
Rating:
